मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगोली गेटच्या अंडरब्रीजला असे स्वरूप आले होते.
ता.क. :- १३ ऑगस्ट २०१० (11:20 AM)
किड्स किंग्डम शाळेच्या बसच्या ड्रायव्हरने आज ४०-५० मुलांचा जीव धोक्यात घातला होता.
त्या साहेबांनी इतके पाणी असतांनाही आणि मुलं नको म्हणत असतांनाही बस सरळ पाण्यात उतरवली होती.
भुयारी मार्गाच्या मध्यभागी आल्यावर बसमध्ये पाणी शिरले आणि ती बंद पडली.
मग काय ? ड्रायव्हर साहेब मुलांना तसंच सोडून तिथून पळून गेले.
मुलांचा ओरडण्याचा आवाज ऎकून आसपासचे लोक तीथे धावत आले आणि त्यांनी त्या लहान मुलांना वाचवले.
धन्य ते ड्रायव्हर साहेब.
मी आत्ताच ही बातमी झी २४ तासवर पाहिली.
0 comments:
Post a Comment