उद्या शहरात गुंतवणूकदारांची राष्ट्रीय परिषद (नांदेड अहेड) भरविण्यात येत आहे.
‘नांदेड अहेड’ या कार्यक्रमादरम्यान तज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध विषयांवरील चर्चासत्रांसोबतच नामवंत कंपन्यांच्या प्रोडक्ट्स आणि कन्सेप्ट्सचे प्रदर्शनसुद्धा असणार आहे.
परिषदेचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
तज्ञांचे मार्गदर्शन ‘वस्त्रोद्योग आणि कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग’ या विषयावर असणार आहे, तर चर्चासत्रांसाठी बँकिग व वित्त पुरवठा, अपारंपरिक ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि औषधी निर्माण, अभियांत्रिकी, पर्यटन, उद्योग इत्यादी विषय ठेवण्यात आले आहेत.
अशी आशा करूयात की या कार्यक्रमानंतर अनेक नामवंत कंपन्या आणि स्वतंत्र व्यावसायिक नांदेडमध्ये गुंतवणूक करतील आणि नांदेड विकासाच्या जोरावर नेहमीच ‘अहेड’ मार्गक्रमण करत राहील.
या परिषदेची अधिक माहिती तुम्ही खालील वेबसाईटवरून मिळवू शकता :-
http://nanded.gov.in/htmldocs/Nanded_2010/Nanded_2010/index.html
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment