Saturday, February 12, 2011

नांदेड अहेडचा दणक्यात शुभारंभ.

 अभिनंदन नांदेडीअन्स !. :-)
‘नांदेड अहेड’च्या पहिल्याच दिवशी अनेक उद्योगपतींनी नांदेडमध्ये गुंतवणुक करण्यास अनुकूलता दर्शविली आहे.


‘नांदेड अहेड’ परिषदेत काल झालेल्या घोषणा :-

उद्योगपती खा. राजकुमार धूत :- व्हिडीओकॉनचे कॉल सेंटर सुरू करण्यात येईल ज्यात १००० ते १५०० युवकांना रोजगार मिळेल.
 
श्री. विनित मित्तल :- ‘वेलस्पन’ तर्फे बाराशे कोटी रुपयांची गुंतवणुक.

मा. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील :- राज्यातील मोजक्‍या चार ते पाच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ‘ऍग्रो इकॉनॉमिक झोन’साठी नांदेडचा प्राधान्याने विचार केला जाईल.

टाटा स्टीलचे उपाध्यक्ष श्री. सेनगुप्ता :- जागा उपलब्ध करुन दिल्यास पोलाद प्रकल्प सुरू करणार.

रिलायन्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या बसरकोड :- लवकरच तिरुपती, हैदराबाद, बेंगलोर आणि पंजाबसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी अनिल अंबानी यांच्या वतीने सांगितले. नांदेड विमानतळाचा विस्तार.

सी.आय.आय.चे अध्यक्ष अरुण नंदा :- जागा उपलब्ध झाल्यास अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करणार.

एस.बी.एच.चे मुख्य महाव्यवस्थापक सुधीर गर्ग :- एस.बी.एच. बॅंकेच्या दोन नव्या शाखा, एक प्रशिक्षण संस्था आणि विभागीय कार्यालय सुरू करण्यात येतील.

2 comments:

Rohit said...

वाह !!

म्हणजे नांदेड आणखी सुधारणार....
पण हे आश्वासनं पाळले गेले तरच काही खरं आहे...हो कि नाही सौरभ ?

सौरभ said...

हे मोठमोठे उद्योजक राजकारण्यांसारखे खोटे आश्वासन देणार नाहीत असे वाटते.

Post a Comment

Post a Comment