नमस्कार मित्रांनो,
स्टार वन ह्या चॅनेलवर "हॅलो कौन.... पैचान कौन" ही नवीन मालिका सुरू झाली आहे.
या कार्यक्रमाचा मूळ उद्देश भारतातील सर्वात चांगला मिमिक्री आर्टिस्ट शोधणे हा आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आहेत नविन प्रभाकर (पैचान कौन फेम) आणि ऐश्वर्या, तर कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून चंकी पांडे आणि सुरेश मेनन हे काम पाहतील.
तुम्हाला वाटत असेल की आपला ब्लॉग तर नांदेडशी संबंधित आहे मग मी ह्या कार्यक्रमाची का प्रसिद्धी करीत आहे.
तर मित्रांनो तुम्हाला हे ऐकून खुशी होईल,
की नांदेडचे 'रामेश्वर महाजन ' (जॉनी लिव्हर यांचे डुप्लिकेट) हे या कार्यक्रमातील स्पर्धकांपैकी एक आहेत.
आहे की नाही मित्रांनो आपल्या नांदेडसाठी गौरवाची बाब ?
शनिवारी रात्री ९ वाजता तुम्ही हा कार्यक्रम स्टार वन वाहिनीवर पाहू शकता.
नांदेडीअन्सतर्फे रामेश्वर महाजन यांना त्यांच्या स्पर्धेतील आणि जीवनातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !!!
Saturday, January 3, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment