Monday, March 9, 2009

मतदानाचा अधिकार

होय मित्रांनो,
नुकताच मला मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि मी त्याचा पुरेपूर वापर करून घेणार आहे योग्य व्यक्तीला निवडून आणन्यासाठी.

हो, मला माहित आहे की माझ्या एकट्याच्या मताने ती योग्य व्यक्ती काही निवडून येणार नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ?

आणि जर आपण सर्वांनी मिळून त्या योग्य व्यक्तीला निवडून आणायचे ठरविले तर काय माहित आपल्या सगळ्य़ांच्या मतांमुळे ती व्यक्ती निवडून येईलसुद्धा.


आता मला हे मात्र माहित नाही की आपल्या कम्युनिटीमध्ये किती लोकांकडे मतदानाचा अधिकार आहे आणि किती लोक त्याचा उपयोग करून घेतात.


माझी तरी मतदानाची ही पहिलीच वेळ असणार आहे, आणि मी मतदान करणारच.
जे सुशिक्षित, सुसंस्कृत नांदेडीअन्स राजकारनावर फक्त्त बोलतात व टिका करतात आणि मतदानाचा अधिकार मिळवूनसुद्धा मतदान करत नाहीत त्यांना माझी विनंती की चला आजपासून मतदान करूयात आणि योग्य व्यक्तीच निवडून येईल याची काळजी घेऊयात.


लक्षात ठेवा, तुम्ही मतदान करत नाही म्हणूनच अपात्र उमेदवार निवडणूक जिंकतात.
तुम्ही जर मतदान करत नसाल तर राजकारण आणि राजकारणी यांच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही.


टीप :- ती योग्य व्यक्ती कोण हे प्रत्येकाने आपले आपले ठरवून घ्यावे.

2 comments:

RD said...

प्रथम आपले अभिनंदन !!!

मलाही नुकताच मतदानाचा अधिकार आहे.
आनंद वाटला की आपल्या सोबत आणखी कोणीतरी आहे पहिल्या वेलेस मतदान करताना .....


मला एक शंका आली आहे ती अशी की.....मतदान करताना तथास्त(NO-VOTE ) OPTION आहे का?
आजच IBN-LOKMAT वर आले होते पण काही कलले नहीं .
तरी त्या ब्द्धाल काही माहीती भेटली तर मी आपला आभारी असेल तसेच मी त्याब्द्हल मज़ा अस्ख्यांख मित्रना देखिल माहीती देईल ......... तरी कृपया ती माहीती द्यावी ..........................


आपला मित्र
राजदीप रायेवर,
नांदेड ४३१६०५.
REPLAY @ rajdeep.rayewar@rediffmail.com
rajdeep751@ gmail.com

सौरभ said...

सर्वप्रथम आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
आणि आपण या विषयावर कमेंट दिल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद.

हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कुण्याही उमेदवाराला तुमचे मत न देण्याचे प्राविधान ELECTION COMMISSION OF INDIA ने प्रत्येक मतदाराला उपलब्ध करून दिले आहे.

नियम ४९-ओ (49-O) नुसार तुम्ही कुणालाही मत द्यायचे नाही हा पर्याय निवडू शकता.

अधिक माहीतीसाठी भेट द्या :-
http://72.14.235.132/custom?q=cache:0cweleXIgeYJ:www.eci.gov.in/press/current/pn051208.pdf+49-O&cd=1&hl=en&ct=clnk&client=pub-6709012001182848

आणि

http://www.caclubindia.com/forum/message_display.asp?quote=114352&group_id=17280&offset=1नोट :- मी इथे वाचकांना वोट न देण्यास प्रवृत्त करत नसून, फक्त राजदीप रायेवार यांच्या शंकेचे निरसन करत आहे.

Post a Comment

Post a Comment