Saturday, March 14, 2009

नांदेडमध्ये संचारबंदी

शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर जमावाने दगडफेक केल्यामुळे शुक्रवारी रात्री शहरात तणावनिर्माण झाला. दगडफेकीत तीन नागरिकांसह सात पोलिस जखमी झाले असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनातकरण्यात आला आहे. दगडफेकीनंतर संतप्त जमावाने आठ वाहने जाळली असून, खबरदारीचा उपाय म्हणूनशनिवारी पहाटेपर्यंत शिवाजीनगर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शिवसेनेतर्फे शुक्रवारी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. रात्री पावणेनऊच्या सुमारास मिरवणूकशिवाजीनगर भागात आली, तेव्हा एका प्रार्थनास्थळाच्या परिसरात असलेल्या जमावाने मिरवणुकीवर दगडफेककेली. त्यानंतर मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनीही दगडफेक केली.
सुमारे ३० ते ३५ दुकानांवरही दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत आमदार श्रीमती खेडकर यांच्या गाडीचेहीनुकसान झाले. जमावाने जीप, ऑटो आणि दुचाकी अशी आठ वाहने जाळली. त्यामुळे दगडफेकीमुळे जमावालापांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ३५ जणांना अटक केली आहे. पोलिस दलासह राज्य राखीव दल दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

(
सकाळ वृत्तसेवा
Friday, March 13th, 2009 AT 11:03 PM)




शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर मिरवणुक आली त्यावेळी पोलीसठाण्यासमोरील नवी आबादी भागातून एका धार्मिक स्थळालगत जमावाने अचानकपणे मिरवणुकीवर तुफान दगडफेक सुरू केली.
काही पेट्रोलबॉंबही मिरवणुकीवर येऊन पडले.
अचानकपणे दगडफेक सुरू झाल्यामुळे मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी नवी आबादीच्या बाजूने दगडफेक केली.
यावेळी दोन्ही बाजूचे जमाव आमने - सामने भिडले त्यामुळे परिस्थीती आणखीनच चिघळली.

--- प्रजावाणी (शुक्रवार, मार्च १३, २००९)





नांदेड शहरातला सर्वात संवेदनशील भाग म्हणून हा परीसर कुप्रसीद्ध आहे.
शिवाजनगर पोलीस स्टेशनच्या अगदी जवळच हा भाग असला तरी काही वेळासाठी का होईना पण प्रत्येक वेळेस परिस्थीती ही नियंत्रणाबाहेर जातेच.

नांदेडमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक अतिशय सलोख्याने राहतात पण काही समाजकंटकांमुळे अशा मिरवणुकींवर दंगलींचे ढग उत्तरोत्तर गडदच होत चालले आहेत.






ता.क. :- (शुक्रवार, मार्च १३, २००९ सकाळचे ७ वाजून २५ मिनीटे)

काल रात्री जमावाने जवळपास २० वाहनांना आग लावल्याचे समजते.
काल शुक्रवारच्या आठवडी बाजारातसुद्धा सगळीकडे धावपळीचे आणि भितीचे वातावरण होते.
आत्ता सकाळीसुद्धा बहुतांश नांदेडीअन्सनी घरीच थांबने पसंत केले आहे.
रस्त्यांवर अगदी संचारबंदीसारखी परिस्थीती दिसून येत आहे.

2 comments:

TW said...

"...एका प्रार्थनास्थळाच्या परिसरात असलेल्या जमावाने मिरवणुकीवर दगडफेककेली..."

जमावाने mhanaje konatya जमावाने ?

spashta bolanyas ghabarane mhanajech patrakarita ka ?

सौरभ said...

जमावाच्या अंगी जाती-धर्म यांसारख्या गोष्टीचा लवशेषही नसतो.

" स्पष्ट बोलण्यास घाबरणे म्हणजेच पत्रकारिता का ? "
हा प्रश्न तुम्ही सकाळ वृत्तपत्राच्या संपादकांना किंवा इतर संबंधीत व्यक्तीला विचारू शकता.

Post a Comment

Post a Comment