Tuesday, November 17, 2009

ट्रॅफिक सिग्नल्स की वाहतूकीच्या दुर्दशेचे सिग्नल्स ?

स्थळ :- चिखलवाडी कॉर्नरजवळील ट्रॅफिक सिग्नल.
ट्रॅफिकवाले मामा :- अनुपस्थीतीत.
रेड लाईटला कुणी थांबतंय का ? :- अक्षरश: कुणीही नाही.
तात्पर्य क्रमांक १ :- नांदेडीअन्सना माहित आहे की ट्रॅफिक सिग्नल हे ट्रॅफिकवाल्या मामांसारखे पावती फाडू शकत नाही.


स्थळ :- आय.टी.आय. कॉर्नर.
ट्रॅफिकवाले मामा :- उपस्थीत.
त्यांना कुणी जुमानतंय का ? :- फारच कमी लोक.
तात्पर्य क्रमांक २ :- ट्रॅफिक सिग्नल्सऎवजी ट्रॅफिकवाल्या मामांना थांबविले तरी काही जास्त फरक पडत नाही.


स्थळ :- आय.टी.एम. कॉलेजपुढील ट्रॅफिक सिग्नल.
ट्रॅफिकवाले मामा :- अनुपस्थीत. (अशोकराव येऊन गेलेत ना ! आता कशाला थांबतील ट्रॅफिकवाले मामा इथे ?)
रेड लाईटला कुणी थांबतंय का ? :- कुणीही नाही.
तात्पर्य क्रमांक ३ :- नांदेडीअन्स दररोज वृत्तपत्र वाचतात, ज्यातून त्यांना कळतं की अशोकरावजी चव्हाण हे नांदेडमध्ये कधी येणार आहेत.


महातात्पर्य = उद्या सगळेच नांदेडीअन्स ट्रॅफिक सिग्नलकडे ट्रॅफिक सिग्नल म्हणून न पाहता दिवाळीची रोषणाई म्हणून पाहायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.

3 comments:

Anand said...

ट्राफिक सिग्नल चालू आहेत हे वाचून खूप बंर वाटलं.... :)

सौरभ said...

फार फार म्हणजे फारच पॉजीटीव्ह विचार करता बुवा तुम्ही. :P

सौरभ said...

By The Way, उद्याचा मराठवाडा या वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे ही कामगिरी. (माझी की पोलीसांची की नांदेडीअन्सची हे तुम्हीच ठरवा.)

Post a Comment

Post a Comment