या छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचा उत्तरार्ध डिसेंबर महिन्यात होणाऱ्या प्रदर्शनाने संपन्न होणार आहे.
या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
यंदा या स्पर्धेसाठी प्रवेशिका येत्या 26 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार असून, 30 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेतील सहभागासाठी प्रवेशिका दाखल करता येतील.
स्पर्धेच्या प्रवेशिका "सकाळ'ची कार्यालये, इंडिया आर्ट गॅलरी; तसेच www.esakal.com आणि www.indiaart.com या संकेतस्थळांवर विनामूल्य उपलब्ध असतील. www.indiaart.com या संकेतस्थळावरून
येणाऱ्या प्रवेशिका ऑनलाइनही स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेसाठी यंदा-
1) स्त्री,
2) मुलं - उद्याची आशा आणि
3) गर्दीपलीकडचा निसर्ग असे विषय असणार आहेत.
या स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज "सकाळ' कार्यालयात देण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रदर्शनात स्पर्धेतील निवडक छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत, त्यासमवेत नामवंतांची व्याख्याने व प्रेक्षकांबरोबर प्रत्यक्ष संवादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे "ब्रॅंड ऍम्बेसिडर' म्हणून दर वर्षीप्रमाणे नामवंत छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष काम पाहणार आहेत.
मी एक नवखा फोटोग्राफर असूनही या स्पर्धेत भाग घेतला आहे.
मी स्पर्धेसाठी पाठवलेले फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सकाळ रिफ्लेक्शन्स २००९
मी स्पर्धेसाठी पाठवलेले फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सकाळ रिफ्लेक्शन्स २००९
1 comments:
फोटो अतिशय सुंदर आहेत, स्पर्धेच्या माहितीकरिता धन्यवाद...
Post a Comment