Tuesday, May 25, 2010

नांदेडची दिव्या बियाणी राज्यात प्रथम



बारावीचा निकाल लागला आज.
अपेक्षेप्रमाणे निकाल कमीच लागला. (अपेक्षेप्रमाणे यासाठी की कारण कॉपी-मुक्ती अभियानामुळे हे व्हायचेच होते.)

उत्तीर्ण होणार्‍यांची टक्केवारी एकंदरीत राज्यभरातच कमी झाली आहे.
त्यातल्या त्यात नांदेडमध्ये ही टक्केवारी सगळ्यात कमी आहे. (२५% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत फक्त.)
नांदेडमध्ये कॉपी-मुक्ती अभियान अगदी मनापासून राबवल्याचे हे चांगले फलित.
अनुत्तीर्ण झालेल्यांबद्दल आम्हाला वाईटच वाटते हो, पण या कॉपी-मुक्ती अभियानामुळे खरे हुषार विद्यार्थी पुढे आले याचा जास्त आनंद वाटतोय. :-)
५० ते ६०% का होईनात पण ते गुण स्वतःच्या मेहनतीने मिळवणार्‍यांची आता तरी कुठे किंमत होईल.


नांदेडच्याच दिव्या बियाणीने राज्यातून पहिला येण्याचा मान पटकावलाय. (दिव्या बियाणी ही नांदेडमधले पत्रकार श्री. गोवर्धन बियाणी यांची मुलगी आहे.)
दिव्या बियाणीचे नांदेडीअन्सच्या तमाम वाचकांकडून हार्दिक अभिनंदन आणि तिच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! :-)


या कॉपी-मुक्ती अभियानातसुद्धा स्वतःची गुणवत्ता अधोरेखित करणार्‍या नांदेडमधील काही शाळा/महाविद्यालये :-

१) सायन्स कॉलेज - ८०.६४ %
२) यशवंत कॉलेज - ७५.३९ %
३) राजर्षी शाहू ज्यु. कॉलेज - ६३.२४ %


ता.. :-(१७ जून २०१० :४० PM)

१० वीचासुद्धा निकाल लागला आज. (सोबतच लातूर पॅटर्नचासुद्धा निकाल लागला.
gile)

अमरावती ---> ८६.१६%
नाशिक
---> ८४.९०%
पुणे
---> ८३.९४%
कोल्हापूर
---> ७९.७५%
नागपूर
---> ७८.६४%
लातूर
---> ४४.४८%


1 comments:

आनंद पत्रे said...

दिव्याचे अभिनंदन.

Post a Comment

Post a Comment