Saturday, December 18, 2010

कुठे गेले हिवाळी पाहुणे ?

ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाळा लांबला त्यामुळे जे स्थलांतरीत पक्षी ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये भारतात यायचे, ते आता डिसेंबरमध्ये येऊ लागले आहेत.
पण यावर्षी त्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
दरवर्षी शेकडोंच्या संख्येने येणारे पक्षी यावर्षी विविध जलाशयांवर बोटावर मोजण्याइतपत संख्येनेच आले आहेत.
हवामान बदलामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या पद्धतीतही मोठे बदल होत आहेत, असे मत पक्षीतज्ञ व्यक्त करीत आहेत.

नांदेडमधील विविध जलाशयांवर जमलेले पक्षी :-


Black Winged Stilt - शेकाट्या (हिवाळी स्थलांतरित)


Little cormorant - छोटा पाणकावळा (निवासी)


Small Pratincole - पाणभिंगरी (निवासी)


Little ringed plover - कंठेरी चिखल्या (निवासी)


Lesser pied kingfisher - कवडा धीवर (निवासी)


Ruddy Shelduck - चक्रवाक (हिवाळी स्थलांतरित)



उर्वरित फोटो तुम्ही माझ्या ऑर्कूट अल्बममध्ये पाहू शकता.

नांदेड ---> ८.२°

यावर्षी हिवाळ्याने नांदेड शहरातला गेल्या १० वर्षांतला तापमानाचा निचांक मोडला आहे.
काल नांदेडमध्ये थंडीचा पारा ८.२° सेल्सीअसपर्यंत घसरला होता.
परभणीमध्ये काल तापमान ५.९° सेल्सीअस होते.

या कुडकुडायला लावणार्‍या थंडीचा संबंध ग्लोबल वार्मिंगशी लावायचा की नाही, हे ज्याचे त्याने ठरवावे, कारण आपल्या ब्लॉगवर ग्लोबल वार्मिंगबद्दल आधीच खूप पोस्ट्स आले आहेत.
(विनंती :- कुणीही खोडसाळपणे प्रश्न विचारू नये ‘हा ब्लॉग नांदेडबद्दल आहे की ग्लोबल वार्मिंगबद्दल ?’)ketukmeje

Wednesday, December 8, 2010

गोदाई.

माफ करा मित्रांनो, परीक्षा असल्यामुळे काही दिवसांपासून ब्लॉग अपडेट करू शकलो नाही.

गोदावरी !
महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणारी ही नदी.

प्रदूषणामुळे गोदावरी नदीची काय अवस्था झाली आहे ही दर्शवणारी एक डॉक्युमेन्ट्री नुकतीच पाहण्यात आली.
तशी ही डॉक्युमेन्ट्री गोदावरीच्या नाशिक येथील दुरावस्थेबद्दल बनवण्यात आली आहे, पण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गोदावरीची अशीच दुरावस्था झालेली आहे.
किंबहुना माझ्या मते नांदेडमध्येच सगळ्यात वाईट परिस्थीती आहे.xpasti
नवीन पुलावरून जेव्हा नांदेडीअन्स गोदामातेला नमन करून प्लॅस्टीकच्या पिशव्या 'अर्पण' करतात, तेव्हा त्यांच्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही.

श्रद्धेला आमचा विरोध नाही, असण्याचा प्रश्नही उद्भवत नाही.
पण श्रद्धा व्यक्त करण्याची जी पद्धत आहे, ती नक्कीच चुकीची आहे.takbole

आता तरी गोदामातेची आर्त हाक ऎका मित्रांनो.



Monday, November 22, 2010

पुन्हा भूकंप.

नमस्कार मित्रांनो,
आज गुगलींग करतांना एक वेबसाईट सापडली.

http://earthquake.itgo.com/today.htm

या वेबसाईटबद्दल थोडी शोधाशोध केल्यावर कळाले की या वेबसाईटवर म्हणे भूकंपाचे प्रेडीक्शन करतात आणि ते खरेही ठरतात म्हणे.
(भूकंपाची भविष्यवाणी करण्याइतपत विज्ञान अजून प्रगत झालेले नाही, त्यामुळे या वेबसाईटवर किती विश्वास ठेवावा हे ज्याचे त्याने ठरवावे.)

२८ ऑक्टोबरला या वेबसाईटवर प्रेडीक्शन करण्यात आले होते की येत्या ४८ ते ३८० तासांत कच्छ (गुजरात), नांदेड, अरेबीयन समुद्र किंवा पाकिस्तान येथे ६ ते ७ मॅग्नीट्युडचा भूकंप होऊ शकतो.

या महिण्यात झालेले भूकंप :- (यात गुजरात, पाकिस्तान आणि नांदेडचाही समावेश आहे.)
http://www.imd.gov.in/section/seismo/dynamic/CMONTH.HTM
&
http://www.asc-india.org/recent.htm


११ नोव्हेंबरच्या भूकंपाचा अपडेट मी तुम्हाला दिलेलाच आहे.
काल (२१ नोव्हेंबर २०१०) दुपारी १२:२० वाजता २.३८ रीश्टर स्केल तिव्रतेचा धक्का जाणवला होता. (यावर्षीचा सगळ्यात मोठा.)
आज (२२ नोव्हेंबर २०१०) संध्याकाळी ५.३० वाजता आणि आत्ता ७:२६ PM वाजता भूकंपाचे दोन मोठे हादरे जाणवले. (काय योगायोग आहे ना ! मी तुम्हाला अपडेट देत असतांना भूकंप व्हायची ही तिसरी ते चौथी वेळ आहे.garupale)


भूकंपादरम्यान आणि नंतर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
http://www.nwmcnanded.org/EarthQuake.htm


P.S. :-

Friday, November 12, 2010

महाप्रलयाचा डेमो : पार्ट २ ?

महाप्रलयाचा डेमो : पार्ट १ आठवतोय ना ? (हा पोस्ट वाचा.)
त्या पोस्टमध्ये फक्त दिनांक आणि वेळ बदला.

महाप्रलयाचा डेमो : पार्ट १
दिनांक --> १२ सप्टेंबर २००८
वेळ --> सकाळी २.०० ते ३.३० पर्यंत.

महाप्रलयाचा डेमो : पार्ट २
दिनांक --> १२ नोव्हेंबर २०१०
वेळ --> सकाळी ४.०० ते ५.३० पर्यंत

काल रात्रीच भुकंपाचा एक मोठा धक्का बसला होता हे विशेष.

बाहेर जोरदार पावसाला सुरूवात झालीये.

Thursday, November 11, 2010

भुकंप अपडेट.

आत्ताच एक भुकंपाचा मोठा धक्का जाणवला. (वेळ रात्रीचे ११ वाजून ३१ मिनीटे.)

Thursday, November 4, 2010

Happy Diwali

ि !


Let me take the opportunity to wish you and your family a very happy DIWALI, glowing with peace, joy & prosperity.

Tuesday, October 26, 2010

धक्के भुकंपाचेच.

गेल्या ३-४ वर्षांपासून सुरू असलेली गूढ आवाजांची मालिका आणि धक्के भूकंपाचेच आहेत हे आता तज्ञांनी मान्य केले आहे.
सोमवारी National Geophysical Research Institute च्या तज्ञ्यांचे एक पथक नांदेडला आले होते.
त्यांनी हे स्पष्ट केले की हा प्रकार भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचाच आहे, शिवाय असे धक्के अजून काही आठवडे बसण्याची शक्यतादेखील त्यांनी वर्तवली आहे.

रविवारी एकंदरीत २० धक्के जाणवले होते आणि त्यापैकी ४ धक्के २ रिश्टर स्केलचे होते.
सोमवारीसुद्धा दिवसभरात भूकंपाचे ४ धक्के जाणवले, त्यातल्या सकाळी ५:१५ च्या भूंकपाची रिश्टर स्केलवर २.३ इतकी नोंद झाली.

ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा भूगर्भातून आवाज सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.xpasti


ता.क. :- (ईसकाळ 26-Oct-10)
नांदेड - ऐन दिवाळीच्या तोंडावर अवतरलेले भूकंपाचे भूत मानगुटीवरून उतरता उतरेना अशी नांदेडकरांची अवस्था झाली आहे.
मंगळवारी (ता. 26) रात्री साडेनऊपासून पुन्हा गूढ आवाजांना सुरवात झाली.
बुधवारी (ता. 27) सकाळी सहापर्यंत जवळपास 18 आवाज झाले.
पैकी चार आवाज मोठे होते आणि त्याची रिश्‍टर स्केलवर नोंद 2.28 आणि 2.25 एवढी नोंदली गेली.
आवाज होताच पळापळ होऊन नागरिक घराबाहेर येत आहेत.
सध्या सहामाही परीक्षा सुरू आहेत; पण भूकंपाच्या आवाज व हादऱ्यांनी विद्यार्थ्यांचीही झोप उडाली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी एकदा भूकंपाचा आवाज झाला होता; परंतु तेव्हा त्याला भूकंप मानायला कोणी तयार नव्हते.
त्यानंतर रविवारी (ता. 24) सकाळी पाच वाजता मोठा आवाज झाला आणि हादराही चांगलाच जाणवला.
रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 2.3 एवढी नोंदली गेली आणि प्रशासन सतर्क झाले.
नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य वैज्ञानिक श्रीनागेशा हेदेखील सोमवारी येऊन पाहणी करून गेले.
त्यांनी हा भूकंपाचाच पण सौम्य धक्का असल्याचे सांगितले.
नांदेडचा परिसर "सी झोन'मध्ये येत असल्याने फारसा धोका नसला तरी प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
रविवारपासून सुरू झालेला हा सिलसिला थांबायला तयार नाही.
मंगळवारी रात्रीपासूनच आवाज आणि हादऱ्यांची मालिका सुरू झाली.
रात्री साडेनऊ, बारा, साडेबारा अशा प्रकारे सकाळी सहापर्यंत 18 धक्के जाणवल्याचे या भागातील लोक सांगतात. या प्रकाराने नागरिकांची घाबरगुंडी उडाली असून, किरायेदार घर सोडून जात आहेत.
रात्र-रात्र जागून काढावी लागते आहे.
घराबाहेर बसून गप्पाटप्पा करीत कशीबशी रात्र काढावी तर घाण आणि त्यामुळे झालेले डास एक सेकंदही बसू देत नाहीत.
महापालिका साफसफाईत सपशेल अपयशी ठरल्यानंतर नागरिकच आता श्रमदानाने साफसफाई करीत आहेत. त्यांनाच रात्र बाहेर जागून काढायची असल्याने ही पाळी ओढवली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षण, नोकरीसाठी आलेली मंडळी सुरक्षित घर शोधण्याच्या कामी लागली आहे.
कित्येकजण तर गावाकडून येणे-जाणे करण्याच्या तयारीने स्थलांतरित झाले आहेत.

जिल्ह्याबाहेरून आलेले नागरिक ज्यांची गावे रेल्वेमार्गावर आहेत, असे लोक निघून गेले आहेत.
मालकीहक्क असलेले नागरिक घरे विकण्याची मानसिकता करीत आहेत.
कित्येकजण दिवाळीच्या सुट्या लागण्याची वाट पाहत आहेत.
एकदा का सुट्या लागल्या की, त्यांनाही किमान पंधरा दिवस या भागापासून फारकत घेणे शक्‍य होणार आहे.

चार हादरे मोठे
मंगळवारी (ता. 26) रात्री साडेनऊपासून बुधवारी (ता. 27) सकाळी सहापर्यंत अतिशय सौम्य असे अनेक हादरे बसले; परंतु त्यातल्या त्यात जाणवणारे हादरे 18 होते. त्यापैकी चार तर 2.25 आणि 2.28 रिश्‍टर स्केल एवढ्या नोंदीचे होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष पावडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.


ता.क. :- (27-Oct-10)
काल नांदेड शहर पुन्हा भूकंपाने हादरले.
काल (बुधवारी) शहराला लहान-मोठे अनेक धक्के बसले, पण सायंकाळी ७.२२ वाजता भूकंपाचा मोठा हादरा बसला.
या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.३ एवढी नोंदविल्या गेली.