Thursday, March 13, 2008
त्रस्त नांदेडकरांच्या काही समस्या
येथे मी वृत्तपत्रात छापून आलेले काही फोटो अपलोड करीत आहे.
१) भारनियमन (परीक्षेपूर्वीची परीक्षा)
(छायाचित्र : मुनवर खान)
सकाळ सोमवार - १० मार्च - २००८
"दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरु होत आहे. परीक्षांच्या काळातही रात्रीचे भारनियमन रद्द करणार नाही, अशी ताठर भूमिका वीज-वितरण कंपनीने घेतल्यामुळे नांदेड शहरातील विद्यार्थ्यांना दिव्याखाली अभ्यास करुन आणखी एका परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे."
परीक्षा फ़क्त १०वीच्याच नाही तर १२वी, इतर U.G. पातळीच्या सुद्धा आहेत.
अतिरीक्त भारनियमनाच्या नावाखाली दररोज २-३ तास अधिक भारनियमन केले जाते, तरिही जनतेने आपला संयम सोडला नाही हे विशेष.
कॉल सेंटरला फोन करुन माहिती विचारण्याचा कधी प्रयत्न केला तर त्यांच्याकडून कधिही समाधानकारक उत्तर मिळनार नाही हे प्रत्येकाने गृहितच धरावे. (प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात पण आता प्रयत्नांती उत्तर द्वारा वीज-वितरण कॉल सेंटर हे लक्षात ठेवायला हवे.)
असो, वीज-वितरण कंपनीवर कोणत्याही मोर्चाचा किंवा आणखी कशाचा काहीच उपयोग होत नाही हे आजपर्यंत तरी दिसून आलयं, मग त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवणारा मनुष्य म्हणजे संयमाचा फ़ारच मोठा पुरस्कर्ता समजावा.
२) आदेश धुडकावले
सकाळ मंगळवार - ११ मार्च - २००८
"शहरातील यूटीआय बँक ते एनटीसी मिल रस्त्यावर हातगादे उभे केल्यास जप्त केले जातील, असा खणखणीत इशारावजा आदेश महापालीका प्रशासनाने एका बोर्डवर लावला आहे.
मात्र, हे काम सरकारी आदेश नेहमीप्रमाणे पायदळी तुडवत, प्रशासनाच्या त्या बोर्डाच्या खालीच एका फळविक्रेत्याने गाडी लावली आहे. वाहतूक पोलीस मात्र त्याकडे पाठ करुन उभा आहे, आता बोला."
सकाळ मंगळवार - 12 - मार्च - २००८
"नांदेड शहरातील यूटीआय बँक ते एनटीसी मिल रस्त्यावर महापालिका प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून हातगाडे उभे राहात असल्याचे चित्र 'सकाळ' ने प्रसिद्ध केले होते. या छायाचित्राची दखल घेऊन वाह्तूक पोलिसांनी तातडीने येथील हातगाडी विक्रेत्यांना हटविले अन् या रस्त्याने आज मोकळा श्वास घेतला."
ता.क.
15 मार्च - २००८ रोजी जेव्हा आम्ही परिस्थिती पाहण्यास गेलो, तेव्हा तो गाडेवाला व्यक्ती त्याचा गाडा तिथेच घेउनउभा होता हे विशेष.
Saturday, March 8, 2008
काही नाही ठीक
भारतीय वाहन बाजारावर एके काळी अधिराज्य गाजवणारा हा उद्योग समूह आणि त्यांची एक गाडी जी फक्त कंपनीच्या नावानेच आजवर ओळखली गेली/जाते, त्या गाडीची थोडी माहिती वाचण्या पूर्वी, या कंपनी बद्दल थोडे फार …
Luna TFR Luna Super भारतीय वाहन उद्योगात फिरोदिया कुटुंबीयांचे एक वेगळे स्थान आहे. आजची फोर्स मोटर्स (अभय फिरोदिया) आणि कायनेटिक मोटर कंपनी (अरुण फिरोदिया) या दोन फिरोदिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दुचाकी वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या उद्देशाने एच. के. फिरोदियांनी कायनेटिक वाहन उद्योगाची स्थापना केली. सर्व प्रथम १९७२ ला कायनेटिक लुनाचे उत्पादन सुरू झाले आणि मोपेड या वाहन क्षेत्रात कायनेटिकने आपले पाय घट्ट रोवले.
मग लुनाचे अनेक प्रकार झाले. लुना टिएफआर (एकाच व्यक्तीकरिता), लुना डबल प्लस, मॅग्नम, सुपर असेच आणि काही प्रकार झाले. खरंतर लुना हा वाहन प्रकार सायकलला पर्याय असा पुढे आला म्हणायला काही हरकत नसावी. एरवी आपोआप चालणारी अन गरज लागल्यास खरोखरच्या सायकल सारखी सुद्धा चालवण्याची सोय या वाहनात होती/आहे. या वाहनाला एकच स्पर्धक होता तो म्हणजे टिव्हीएस ५०. लुना नंतर कायनेटिक सफारी आली. पण कायनेटिक हे नाव जास्त लोकप्रिय झाले म्हणा अथवा त्यांचे जे वाहन फक्त कंपनीच्या नावानेच ओळखले गेले ती म्हणजे कायनेटिक स्कूटर होय. सायकल सदृश गाड्यांना, अवजड अन तोल सांभाळायला अवघड अश्या बजाज, एलएमएलच्या स्कूटर्सना सशक्त पर्याय म्हणजे कायनेटिकची स्कूटर. या गाडीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीने शहरातल्या स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला.
भारतीत वाहन उद्योगात ८० चे दशक म्हणजे बजाजच्या स्कूटरचा सुकाळ होता. काही पैसे भरून, 4S वाट पाहून बजाजांची स्कूटर मिळवणे म्हणजे लोकांना प्रचंड कौतुक होते. या काळातच स्त्रिया सुद्धा आत्मविश्वासाने कार्यालयीन नोकरी करू लागल्या होत्या. पण त्यांचा रोजचा प्रवास म्हणजे स्वतःच्या “ह्यांच्या” स्कूटर वरून, बसने अथवा रिक्षाने. एखादी जास्त स्वावलंबी स्त्री असेल तर लुना. पण स्कूटर म्हणजे परिवाराची गाडी होती. बदका सारखा आकार, सामान ठेवायला थोडी जागा, मोपेड पेक्षा जास्त शक्ती, सोबत गियर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती, पत्नी, एक पुढे उभे राहणारे मूल आणि एक आईच्या मांडीवर बसणारे लहान मूल अशा चौकोनी कुटुंबाला वाहून नेण्याची क्षमता ही या स्कूटर्सची ठळक वैशिष्ट्ये होती.
याच काळात भारतीय वाहन उद्योगात जपानी कंपन्यांनी प्रवेश केला. १९८४ साली कायनेटिकने जगप्रसिद्ध होंडा कंपनी बरोबर सामंजस्य स्वीकारले आणि स्कूटरचे उत्पादन सुरू केले. वर लिहिल्या प्रमाणे बजाज- एलएमएलच्या स्कूटरची ठळक वैशिष्ट्ये होतीच. पण त्याच सोबत काही वेळा स्कूटर्सची अशी काही वैशिष्ट्ये होती की जी डोके दुखी ठरायची. त्यातली काही Nova 135 म्हणजे, डाव्या हाताला सगळे गिअर्स आणि क्लच, पाय ठेवायच्या सपाट जागेत मध्येच डोके वर काढणारा मागच्या चाकाचा ब्रेक, एका बाजूला असलेले इंजिन आणि फक्त मधले स्टँड. तसेच बंद पडल्यास चालकाच्या बसण्याच्या जागे जवळ असलेला पेट्रोलचा नियंत्रक आणि चोक यांच्या मदतीने स्कूटर सुरू न झाल्यास, रस्त्यातच स्कूटर तिरकी करणे आणि मग पाय दुखे पर्यंत किक मारणे हा एक मोठा त्रासदायक मुद्दा असायचा. या सर्व त्रासदायक बाबी लक्षात घेऊन आणि खास करून नोकरदार स्त्रिया हा ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कायनेटिक होंडाने आपली स्कूटर बाजारात आणली.
कमी पसारा असलेली, दिसायला सुंदर, काही तरी नवे वाहन असा ठसा उमटवणारी, मुख्य म्हणजे, इंजिन मध्यभागी असल्याने तोल सांभाळायला सोपी, गिअर विरहित, त्यामुळे चालवायला सहज सोपी, बसायला एकसंध आणि मोठी सीट, पेट्रोल नियंत्रकाची - चोकची कटकट नसलेली, वाहनक्षमता स्कूटर इतकीच असलेली, एका बाजूला कलून Flyte लावण्याची व्यवस्था असलेली, स्कूटर इतकीच शक्तिशाली अन सुसाट धावणारी आणि मुख्य म्हणजे किक अथवा फक्त एक खटका दाबून सुरू होणारी अशी हि स्कूटर अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या स्कूटरने, या वाहन प्रकारात, फक्त एक खटका दाबून सुरू होणे, गिअर बॉक्स ऐवजी व्हेरीएटर (गिअर्स टाळण्या करिता), दोन्ही ब्रेक हातात, हि नवीन वैशिष्ट्ये बाजारात आणली. कायनेटिक होंडा डिएक्स आणि झेडएक्स असे दोन प्रकार उपलब्ध होते. ९८ घनसेमी क्षमतेच्या आणि टू स्ट्रोक इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये पहिला बदल झाला तो २००१ साली. इंजिनाची क्षमता ११० घनसेमी झाली. पण बाकी सगळे तेच होते. मधल्या काळात १९९८ साली होंडा कंपनीने साथ सोडली. अन स्वतःची भारतात वेगळी चूल मांडायचे मनसुबे सत्यात आणायला सुरुवात केली. मग २००५ साली कायनेटिकने बाह्य स्वरूप तेच ठेवून ११३ घनसेमी क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन वाली हिच स्कूटर ग्राहकांसमोर आणली. पण तोवर उशीर झाला होता. अनेक स्पर्धकांनी आपापल्या अशाच गाड्या, स्कूटरेट बाजारात आणल्या होत्या. खुद्द होंडाने ऍक्टिव्हा आणली जी ग्राहकांना आवडली.
कायनेटिकने स्पर्धा म्हणावी तेवढी योग्य प्रकार हाताळली नाही. मग ती स्कूटरेट प्रकारातली प्राइड असो, कायनी, नोवा अथवा त्यांच्या मोटर सायकल असोत, अथवा स्टेप थ्रु, अथवा आयात केलेल्या इतर कंपन्यांच्या गाड्या. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात कायनेटिक म्हणावी तेवढी यशस्वी ठरली नाही. आज सुद्धा कायनेटिक नव्या गाड्या सादर करत आहे.
बिपाशा बसूला घेऊन केलेल्या जाहिरातीमुळे फ्लाईट नावाची स्कूटरेट थोडी फार विकली जात आहे. पण तीन गिनेज रेकॉर्ड करणार्या कायनेटिक होंडाच्या स्कूटरच्या यशाची उंची गाठणे अवघडच दिसते आहे.
अरुण फिरोदियांच्या कन्या, सुलज्जा फिरोदिया-मोटवानी या कंपनीची कमान सांभाळत आहेत. पण पूर्वीचे यश अन आजची स्पर्धा पाहिल्यावर जर त्यांना कोणी विचारलं, कस काय चाललंय सगळं तर त्या नक्कीच म्हणती, फार खास असं, काही नाही ठीक…..
साभार : http://aryachanakya.wordpress.com/
Monday, March 3, 2008
शिर्डी साईबाबा दर्शन : लाईव्ह
श्री शिर्डी साईबाबा संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळाने ही सुविधा सर्व भाविकांना उपलब्ध करुन दिली आहे.
पण काही तांत्रिक कारणांमुळे तुम्ही फ़क्त 'समाधी मंदिराचेच' ऑनलाईन दर्शन घेउ शकता, भाविकांना 'द्वारकामाईचेही' ऑनलाईन दर्शन घेता यावे याकरीता संस्थानाच्या संकेतस्थळावर काम सुरु आहे.
साईबाबांच्या लाईव्ह दर्शनाकरीता तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमधे 'विंडोज मिडिया प्लेयर'(व्हर्जन 9 किंवा अधिक) इंस्टॉल करावा लागेलं.
नांदेड विमानतळ
नांदेड विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे .
विमानतळाचे काही अंशी काम पूर्ण झाले आहे.
Sunday, March 2, 2008
नांदेड शहर : विकिपीडिया
भौगोलिक स्थान
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि आंध्रप्रदेशच्या उत्तर-पश्चिम सीमेजवळ हा जिल्हा येतो. नांदेड महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील एक महत्वाचा जिल्हा आहे. लातूर, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि निजामाबाद हा आंध्रप्रदेशातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.
वाहतूक व्यवस्था
नांदेड हे भारतीय रेल्वेच्या दक्षीण मध्य विभागात येते आणि मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडसाठी थेट सेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते जी दिल्ली, आग्रा, औरंगाबाद या मोठ्या शहरांशी जोडते. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेडसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची थेट बससेवा उपलब्ध आहे.
भाषा
नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी आहे. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते.तेलगु,व उर्दुचा उपयोगही केला जातो.
परंपरा
माळेगावची जत्रा , हिंदु व शिख समुदायाचा दसरा हे वार्षीक सोहळे अत्यंत छान असतात.येथे गणेश उत्सवसुद्धा उत्साहाने साजरा केला जातो.
वृत्तपत्रे
नांदेड येथून प्रसिद्ध होणारी वृतपत्रे -
- दैनिक प्रजावाणी
- दैनिक गोदातीर
- दैनिक लोकपत्र
- दैनिक देशोन्न्ती
- दैनिक भुमीपुत्र
शिक्षण
नांदेड हे शैक्षणीकदृष्ठा महत्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात.
विद्यापीठ
इ.स. १९९५ साली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि सध्या १७२ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.
उच्च माध्यमिक परिक्षा विभाग
- लातूर
- नांदेड
- उस्मानाबाद
शैक्षणिक संस्था
उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालये
अभियांत्रिकी महाविद्यालये
- श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय
- महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय
वैद्यकीय महाविद्यालये
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखा महाविद्यालये
- नांदेड एज्युकेशन सोसायटीचे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज|सायन्स कॉलेज
- नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज
- शारद भुवन शैक्षणिक संस्थेचेयशवंत महाविद्यालय
- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय
- वसंतराव नाईक महाविद्यालय
राजकारण
नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. स्व. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकिय स्तरावर माहित असलेले महत्वपूर्ण व्यक्ति होते. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारत देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादि पदे भूषविली.
जरुर वाचावीत अशी काही पुस्तकं.
प्रत्येक मराठी माणसाने जरुर वाचावीत अशी काही पुस्तके.
१) द मॅजिक ऑफ़ थिंकींग बिग
मूळ लेखक - डेव्हिड जोसेफ श्वार्त्झ
अनुवाद - तळणीकर प्रशांत
प्रकाशक - मेहता पब्लिशींग हाऊस
किंमत - २०० रूपये
"— ³â›ù§âýô òû›˜ô ù¬âŒýôÃŒ£û ù±â£û' š¾ ¯â庫âýô ¦âû¥âç®â §â£û²â™û«â¶´âû ¶â½âû¦â‚âã ¶âû¾ýôû‹®âã òû¯â¶´âû §âã¦â®âû«â ºâå‚âû™ªûû ¤â•¦âç®â òûªû¶â¾¶âã òûš¾. ¯â}¾™ªûû (motivation) ´âû ù¦â¹â´âû¦â™¥â¾ öýô òû¤âû•ã¥â¾ «â§Ÿâ ³šªûç®â ³âû®´â«âû òºâ¶â¾¶â¾ •û›. ¸¦âû«¨â{, «â峚û¶âû òù‚âýô ¥âû‹£û¶âã ù¦âý}ôà ýô™ª´âûºâû”ã, òù‚âýô ¥âû‹£û¶â‹ ¦´â¦âº¬âû¯â®â ýô™ª´âû«â, òù‚âýô ¯âîºâû ù³âð¦âª´âû«â òûùªû ºâ¦âû|«â ³âš«¦âû¥â‹ ³šªûû§â¾ òù‚âýô ºâ³âû‚âû®â òûùªû ³â®â:¸ûû‹«âã ù³âð¦âª´âû³â‚´â¾, ´âû ¯â庫âýôûÌû™¾ ³â—«â ýô™«âû«â.
"— ³â›ù§âýô òû›˜ô ù¬âŒýôÃŒ£û ù±â£û' ´âû ¯â庫âýôû«â «â峚û¶âû ù®â¦¦âð ¯âû¾ýôð òûÚûºâ®â‹ ®âûšã, «â™ ¦´â¦âšû´â{, ¯â}«´â½â ýôÕô®â ¯âûšª´âû§âû¾£´âû ¯âЫâã ºâû¯â•«âû«â। ´âû«â¶´âû ýô¶¯â®âû òûùªû «â‹Áâ‹ ó«âýôà º¦â«â‹Áâ ¯â}Àû¾¥âã òûš¾«â, ýôà «´âû ºâ³â§âû¦âç®â ºâû‹£ûª´âûýô™«âû ¶â¾¢âýôû¶âû öýô ºâ‹¯âçªû{¯âªû¾ ®â¦âû ¸û±—ºâ‹£û}š¥â ù®â³âû{ªû ýô™ª´âû¥âã £û™§â ¯â•¶â¾¶âã òûš¾. ®âû¾ýô™ã ¦âû ƒÊû¾£û, ¦âî¦âûùšýô òûùªû ýôûî“å‹ù±âýô §âã¦â®â òûùªû ºâû³âûù§âýô «âºâ¾¥â ºâû‹ºýþôù«âýô ýôû´â{ý}ô³â ´âû ºâ¦â{¥â ±âû±â«âã«â ²â¦´â ¯â.³âûªûû«â §â£ûª´âû¥âû öýô ºâåù®â´âû¾ù§â«â ýôû´â{ý}ô³â¥â •û›. ¸¦âû«¨â{ òû¯â¶´âûºâ³âû¾™ ºâû—™ ýô™«âû«â. òû¯â¶´âû òûºâ¯âûºâ¥´âû ó«â™ ¶âû¾ýôû‹¯â¾½âû Þ¾¹” ”™ª´âûºâû”ã «âå³â¥´âû§â¦âð ò˜ôû“ ±âåùгâÀûû ùýŒô¦âû ³âšû®â ¯â}ù«â²âû òºâª´âû¥âã £û™§â ®âûšã. £û™§â òûš¾ «âã ´â¸û ù³âð¦âç®â —¾ªûûµ´âû ¯âЫâã®â‹ ù¦â¥âû™ òûùªû òû¥âû™ ýô™ª´âû¥âã, š¾ «â¾ ùºâÐ ýôÕô®â —û¢â¦â«âû«â. òûùªû š¾ ýôºâ‹ ºâû‚´â ýô™û´â¥â‹, ´âû¥âã £ûåù¯â«â‹ š¾ ¯â庫âýô «â峚û¶âû ¯â噦â«â‹!
२) इडली ऑर्किड आणि मी
लेखक - विठ्ठ्ल व्यंकटेश कामत
प्रकाशक - मॅजेस्टिक प्रकाशन
किंमत - १५० रुपये
एक ध्येयाने झपाटलेला हॉटेल व्यावसायिक सतत अविरत कष्ट,जिद्द,सखोल निरिक्षण आणि आई-वडिलांनी केलेले उत्तम संस्कार ह्यांच्या बळावर किती उत्तुंग शिखर पादाक्रांत करु शकतो ह्याची एक चांगली सत्य आणि प्रेरक कथा आहे। अतिशय प्रामाणिकपणे आणि कुठेही अहंमन्यता न उतरवता लिहिलेलं हे पुस्तक आहे.
3) आमचा बाप आन आम्ही
लेखक - डॉ. नरेंद्र जाधव
प्रकाशक - ग्रंथाली
किंमत - ६० रुपये
अलीकडील काळातील मराठीतले 'बेस्ट सेलर' पुस्तक.
या पुस्तकाच्या १६ आवृत्ती निघाल्या आहेत.
४) रातवा
लेखक - चंद्रकुमार नलगे
प्रकाशक - अजब पब्लिकेशन्स
किंमत - ४०० रुपये
आत्मकथनात एका आयुष्याची कहाणीही असते आणि जगण्यातला इत्यर्थही असतो .
हे जगणं जगासारख असूनही जगावेगळ असतं.
जगापासून वेगळं हौऊन आपलं जग, आपलं जगणं न्याहाळू लागलो की आपलीच वाटचाल विस्मित करून जाते .
चंद्रकुमार नलगे यांची ही कहाणी म्हणजे संघर्शयात्रा आहे;तिमिरातून तीर्थाकडे जाणारी जणू तपश्चर्याच !
लेखकाचं भावजीवन भोवतालनं भारलेलं असतं. 'भाव'तलाशी नाळ जोडून घेण्याचं बळ भोवतालानंच दिलेलं असतं
'रातवा' हे आत्मकथन त्याचाच एक ज्वलंत दाखला आहे।
५) एका रानवेड्याची शोधयात्रा
लेखक - कृष्णमेघ कुंटे
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
किंमत - २०० रुपये
पुस्तकातील एक उतारा
" व्हिडीओ कॅमेरा काढून अरूण रानकुत्र्यांच्या हालचाली टिपत होता। त्याच्या कामाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा भाग। मी दुर्बीण डोळ्यांना लावून ठेवली होती. मागे सिद्धाला काहीच काम नसल्याने तो गवताची काडी चावत झोप आवरत बसला होता. दुपारची वेळ. जंगलातला सुखावणारा गारवा. बुडाखाली हिरवं, ओलसर, गार गवत. कानाला सुखावणारा आणि फक्त तेवढाच पक्ष्यांचा आवाज. जोडीला मधूनच ’झिल्ली’ किड्याचा वाढत जाऊन मग पटकन थांबणारा आवाज. तोही आर. डी. बर्मननं चाल लावल्यासारखा पकड घेणारा. या साऱ्या वातावरणात आम्ही आरामात बसलो होतो. सगळे स्नायू शिथील झालेले.... "
Saturday, March 1, 2008
पु.ल.देशपांडे MP3
04502.mp3
04503.mp3
AntuBarwa-001.mp3
AntuBarwa-002.mp3
CHITAL1-001.mp3
CHITAL1-002.mp3
Hari_narayan_1.mp3
Hari_narayan_2.mp3
MHHAIS.mp3
MiAaniMazhaShatrupaksha.mp3
PalivPrani.mp3
postoffice-011.mp3
postoffice-021.mp3
postoffice-031.mp3
postoffice-041.mp3
Rao_saheb_1.mp3
Rao_saheb_2-001.mp3
Rao_saheb_2-002.mp3
SakharamGatne.mp3