नांदेडीअन्स आजकाल फ़ार त्रस्त झाले आहेत, याला एकच नाही तर अनेक कारणॆ आहेत तरी अजून नांदेडकराने आपला संयम सोडला नाही यातच संबंधितांनी समाधान मानावे.
येथे मी वृत्तपत्रात छापून आलेले काही फोटो अपलोड करीत आहे.
१) भारनियमन (परीक्षेपूर्वीची परीक्षा)
(छायाचित्र : मुनवर खान)
सकाळ सोमवार - १० मार्च - २००८
"दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरु होत आहे. परीक्षांच्या काळातही रात्रीचे भारनियमन रद्द करणार नाही, अशी ताठर भूमिका वीज-वितरण कंपनीने घेतल्यामुळे नांदेड शहरातील विद्यार्थ्यांना दिव्याखाली अभ्यास करुन आणखी एका परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे."
परीक्षा फ़क्त १०वीच्याच नाही तर १२वी, इतर U.G. पातळीच्या सुद्धा आहेत.
अतिरीक्त भारनियमनाच्या नावाखाली दररोज २-३ तास अधिक भारनियमन केले जाते, तरिही जनतेने आपला संयम सोडला नाही हे विशेष.
कॉल सेंटरला फोन करुन माहिती विचारण्याचा कधी प्रयत्न केला तर त्यांच्याकडून कधिही समाधानकारक उत्तर मिळनार नाही हे प्रत्येकाने गृहितच धरावे. (प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात पण आता प्रयत्नांती उत्तर द्वारा वीज-वितरण कॉल सेंटर हे लक्षात ठेवायला हवे.)
असो, वीज-वितरण कंपनीवर कोणत्याही मोर्चाचा किंवा आणखी कशाचा काहीच उपयोग होत नाही हे आजपर्यंत तरी दिसून आलयं, मग त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवणारा मनुष्य म्हणजे संयमाचा फ़ारच मोठा पुरस्कर्ता समजावा.
२) आदेश धुडकावले
सकाळ मंगळवार - ११ मार्च - २००८
"शहरातील यूटीआय बँक ते एनटीसी मिल रस्त्यावर हातगादे उभे केल्यास जप्त केले जातील, असा खणखणीत इशारावजा आदेश महापालीका प्रशासनाने एका बोर्डवर लावला आहे.
मात्र, हे काम सरकारी आदेश नेहमीप्रमाणे पायदळी तुडवत, प्रशासनाच्या त्या बोर्डाच्या खालीच एका फळविक्रेत्याने गाडी लावली आहे. वाहतूक पोलीस मात्र त्याकडे पाठ करुन उभा आहे, आता बोला."
सकाळ मंगळवार - 12 - मार्च - २००८
"नांदेड शहरातील यूटीआय बँक ते एनटीसी मिल रस्त्यावर महापालिका प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून हातगाडे उभे राहात असल्याचे चित्र 'सकाळ' ने प्रसिद्ध केले होते. या छायाचित्राची दखल घेऊन वाह्तूक पोलिसांनी तातडीने येथील हातगाडी विक्रेत्यांना हटविले अन् या रस्त्याने आज मोकळा श्वास घेतला."
ता.क.
15 मार्च - २००८ रोजी जेव्हा आम्ही परिस्थिती पाहण्यास गेलो, तेव्हा तो गाडेवाला व्यक्ती त्याचा गाडा तिथेच घेउनउभा होता हे विशेष.
Thursday, March 13, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment