Sunday, March 2, 2008

नांदेड शहर : विकिपीडिया

नांदेड हे महाराष्ट्रातील राज्यातील नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. मराठवाडा या विभागात असलेले नांदेड शहर हे नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे .नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते। नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे.


भौगोलिक स्थान

महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि आंध्रप्रदेशच्या उत्तर-पश्चिम सीमेजवळ हा जिल्हा येतो. नांदेड महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील एक महत्वाचा जिल्हा आहे. लातूर, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि निजामाबाद हा आंध्रप्रदेशातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.

वाहतूक व्यवस्था

नांदेड हे भारतीय रेल्वेच्या दक्षीण मध्य विभागात येते आणि मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडसाठी थेट सेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते जी दिल्ली, आग्रा, औरंगाबाद या मोठ्या शहरांशी जोडते. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेडसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची थेट बससेवा उपलब्ध आहे.



भाषा

नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी आहे. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते.तेलगु,व उर्दुचा उपयोगही केला जातो.

परंपरा

माळेगावची जत्रा , हिंदु व शिख समुदायाचा दसरा हे वार्षीक सोहळे अत्यंत छान असतात.येथे गणेश उत्सवसुद्धा उत्साहाने साजरा केला जातो.

वृत्तपत्रे

नांदेड येथून प्रसिद्ध होणारी वृतपत्रे -

  • दैनिक प्रजावाणी
  • दैनिक गोदातीर
  • दैनिक लोकपत्र
  • दैनिक देशोन्न्ती
  • दैनिक भुमीपुत्र

शिक्षण

नांदेड हे शैक्षणीकदृष्ठा महत्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात.

विद्यापीठ

इ.स. १९९५ साली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि सध्या १७२ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.

उच्च माध्यमिक परिक्षा विभाग

  • लातूर
  • नांदेड
  • उस्मानाबाद

शैक्षणिक संस्था

उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालये

अभियांत्रिकी महाविद्यालये
  • श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय
  • महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालये
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
  • शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखा महाविद्यालये
  • नांदेड एज्युकेशन सोसायटीचे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज|सायन्स कॉलेज
  • नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज
  • शारद भुवन शैक्षणिक संस्थेचेयशवंत महाविद्यालय
  • नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय
  • वसंतराव नाईक महाविद्यालय


राजकारण

नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. स्व. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकिय स्तरावर माहित असलेले महत्वपूर्ण व्यक्ति होते. शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारत देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादि पदे भूषविली.

Post a Comment