नाव :- राघवेंद्र कट्टी
पत्ता :- ९, कट्टी फोटो गॅलरी, वजिराबाद, नांदेड.
दूरध्वनी :- ०९३२५६१०९१४
शिक्षण :- पदव्युत्तर (सुक्ष्मजीवशास्त्र)
ई - मेल आय. डी. :- katti_photo@yahoo.com
फोटोग्राफी या क्षेत्राकडे आपण कसे वळालात ?
- हा एक निव्वळ अपघात होता.
फोटोग्राफीचे शास्त्रशुद्ध शिक्षण आपण कुठे घेतले आहे ?
- कुठेच नाही, मी स्वत:च शिकलो.
या क्षेत्रात आपण कोणाला आपला गुरू मानता ?
- इंटरनेटला.
फोटोग्राफी या क्षेत्रात आपल्याला काही चांगले अनुभव आले आहेत का ?
- हो, अगदी आकाशातील तारयांएव्हढे.
काही वाईट अनुभव ?
- एखाद - दुसरा, पण आठवु इच्छीत नाही.
तुम्ही स्वत: काढलेल्या फोटोपैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेले फोटो.
- १९९४ मध्ये काढलेला निवडूंगाच्या फुलाचा आणि माउंट अबु येथे काढलेला "Dew I Love" ह्या शिर्षकाचा फोटो.
आपल्या एखाद्या चित्राची राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे का ?
- होय, दोन आंतरराष्ट्रीय व एक राष्ट्रीय पातळीवर निवड झालेले चित्रं आहेत.
फोटोग्राफीसाठी तुमचा सर्वात आवडता विषय कोणता ?
- चाईल्ड आणि नेचर फोटोग्राफी.
या क्षेत्रात आपल्याला मिळालेले मानसन्मान.
- International Libarty of Photography या संस्थेकडून माझा सन्मान झाला आहे.
आपण कोणते कॅमेरे वापरता ?
- मी 'Canon' वेडा आहे.
बहुदा आपण नांदेडमधील एक्मेव फोटोग्राफर आहात की ज्यांची Orkut, Youtube यासारख्या Social Networking साईट्सवर प्रोफाईल आहे.
- होय.
नवोदीत फोटोग्राफर्स इंटरनेटवरून भरपूर काही शिकू शकतात किंवा आपली कला जगापुढे मांडू शकतात. त्यांना काय सांगावसं वाटतं आपल्याला ?
- प्रयत्न करा, यश नक्की आहे. एक-दोन प्रयत्नात निराश होवू नका.
धन्यवाद कट्टी सर, आपण 'नांदेडीअन्स' साठी आपला अमुल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
Sunday, September 28, 2008
Saturday, September 27, 2008
* गुरु - ता - गद्दीचे काम पूर्ण करण्याचा पहिला मान आसना नदीच्या पुलाला *
गुरु - ता - गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त तसेच जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गतच्या नदीवरील आणि शहरातील उड्डाण पुलांची कामे दररोज नव्या अडथळ्यांचा सामना करीत असतांना सर्वात उशिरा मंजूरी मिळूनही सर्वात अगोदर वाहतूक सुरु करण्याचा मान आसना नदीवरील पुलाला मिळाला आहे.
सा. बां. विभागाच्या राज्य मार्ग प्रकल्प शाखेने दिलेल्या मुदतीत केवळ कामच पूर्ण करुन दाखवले नाही तर स्पर्धात्मक निविदेतून दोन कोटी रुपयांची बचत केल्याने हे काम सर्वाच्या नजरेत भरण्यासारखे आहे.
येत्या दि. ४ ऑक्टोबरपासून हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार असून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंघ, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे.
पुलाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असून, वाहतुकीची चाचणीही यशस्वी झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
आसना नदीवरील पुल हा नांदेड, अकोला व अमरावती तसेच सोलापूर - नांदेड - नागपूर या दोन मुख्य रस्त्यांना जोडणारा मोठा दुवा आहे. या पुलाची उंची जमिनीपासून १२ तर समुद्रसपाटीपासून ३५४.७१५ मीटर इअतकी कमी असल्याने गोदावरीच्या पुराचे पाणी तुंबले की आसना नदीला पूर येऊन वाहतूक ठप्प होत होती.
त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्यासाठी शेजारीच नव्या पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ९ कोटी ८७ लाख ही कामाची अंदाजीत किंमत असली तरी अहमदपूरच्या राजदीप बिल्डकॉन कन्स्ट्रक्शनने स्पर्धात्मक निविदा कमी दराची भरून शासनाचे २ कोटी रुपये वाचविले आणि केवळ ७ कोटी ८८ लाख रुपयात काम करताना, वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य दिले.
नांदेडमधील पुलांप्रमाने या पुलाच्या कामातही अडथळे आले, परंतु बांधकाम खात्याच्या राज्यमार्ग प्रकल्प विभागाने जमिनीच्या मोबदल्याचा गुंता काम सुरु करतानाच सोडवत सर्व अडथळे पार केले.
जवळपास २ कोटी रुपयांचा मावेजा पुल व त्याला जोडणारया रस्त्यासाठी शेतक-यांना उपलब्ध करुन दिला.
गेल्या दि. ८ नोव्हेंबर २००७ रोजी नव्या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. २०० मजुरांच्या मदतीने ३५० मिटर लांब, साडेसात मीटर रुंद आणि जमिनीपासून १८ मीटर उंच आकाराच्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. ३० नोव्हेंबर २००८ ही काम करण्याची अंतिम मुदत होती.
गुरु - ता - गद्दी अंतर्गत या विभागाला सर्वात शेवटी हे काम दिल्या गेले. परंतू अधिक्षक अभियंता सुनील वांढेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. काळेकर, उपअभियंता के. आर. पाटील, सहाय्यक अभियंता एस. एस. हाके यांनी 'राजदीप'चे सहाय्यक महाव्यवस्थापक विश्वास खडकीकर यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करुन दिवस - रात्र मोठ्या यंत्रणेचा वापर करुन मुदतीपूर्वीच काम करुन घेतले.
या पुलाच्या दोन्ही बाजूचे जोडरस्त्यांचे काम पाटील कन्स्ट्रक्शनच्या वतीने ठेकेदार गणपतराव मोरगे व त्यांच्या सहका-यांनी पूर्ण केले आहे.

--- गोविंद करवा
प्रजावाणी २७ सप्टेंबर २००८
प्रजावाणी २७ सप्टेंबर २००८
Labels:
स्थानिक वृत्तपत्रांमधील बातम्या
Friday, September 26, 2008
नांदेडमधील गुरूद्वारे
नमस्कार मित्रांनो,
आपण सर्वजण नांदेडमध्ये राहतो, पण आपल्यापैकी
किती लोकांना नांदेडमधील गुरूद्वारयांची नावे माहित आहेत ?
किती लोकांना गुरुद्वारयांचा पत्ता माहित आहे ?
किती लोक सर्व गुरुद्वारे पाहून आले आहेत ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हालाही माहित आहेत त्यामुळे इथे त्यांची उत्तरे लिहिण्यापेक्षा मी त्या उत्तरांची कारणमिमांसा करणार आहे.
आज मी इथे नांदेडमधील सर्व गुरूद्वारयांची माहिती देणार आहे.
सर्व शिख बांधवांना समजावे म्हणून ही माहिती इंग्रजीमध्ये देण्यात येईल.
१) तख्त सचखंड श्री हजुर साहिब अबचलनगर
The Eternal Father willed and I raised the Panth. All my Sikhs are hereby ordered to accept the Granth as their Preceptor. Have faith in the holy Granth, as your master and consider it the visible manifestation of the Gurus. He who hath a pure heart will seek guidance from its holy words."
........These are the words uttered by Guru Sri Gobind Singh ji, before he left for his heavenly abode (Parlok Gaman) along with his horse Dilbag on October 7, 1708 at Nanded in Maharashtra.
A few days before Parlok Gaman, Guru Gobind Singh ji ended the line of personal Guruship by appointing the “Granth Sahib” (Gur-Ta-Gaddi) as his official successor with the status of ‘Eternal Guru’. His objective was great and laudable. He fully realized that human beings are perishable, but noble ideas live forever – they are eternal. For this reason he made the Granth Sahib a repository of sublime ideals, a spiritual and secular guru that contains hymns of Muslim, Hindu, and Harijan saints in addition to the compositions of sikh gurus. He thus entrusted the destiny of the Khalsa not to a charismatic personality but to the collective wisdom of the community. His sole mission was to restore mankind to a single brotherhood.
२) नगिना घाट साहिब
Gurudwara Nagina Ghat Sahib stands on the bank of Godavari river, about 400 mtrs., southwest of Sachkhand Sri Hazur Sahib. According to a folklore, a rich merchant went to Guru Gobind Singh ji while he was watching the river flow. Proud of his wealth, he presented a nagina (precious stone set in gold) to the Guru, who took it and casually threw it in the river. The merchant bore a look as if pitying the Guru that he did not understand the value of the nagina.
Guru ji read his thoughts and bade him to take out his nagina from the river if that was so valuable. It is said that when the devotee entered into the river, to his surprise, the river bed was full of precious stones all around. Purged of his false pride, the merchant fell at the Guru's feet.
The present building stands on a high plinth which comprises of a square hall in which Guru Granth Sahib ji is seated on a canopied palaki of white marble and a smaller square room topped by a dome on the first floor.
३) बंदा घाट साहिब
Guru Gobind Singh had heard about Bairagi Sadhu from Mahant Jait Ram of Singh Dadu Dwara. His original name was Lachhman Das. A Rajput by birth he had been trained in the martial arts and had been fond of hunting. A chance killing of a pregnant doe at his hands transformed him first into a remorseful sinner in search of redemption, and later, after having acquired some occult powers through austerities and single minded devotion to learning of such arts, into an arrogant recluse impatient with lesser mortals, Guru Gobind Singh, within a few days of his arrival at Nanded came to see him here, according to Bhatt Vahi sources on 3rd September 1708. Madho Das was not in his hermitage then, and the Guru decided to wait for him. It is said that in order to test the Bairagi�s mettle, the Guru deliberatly provoked him by having some of the former�s goats slaughtered by the Sikhs. This naturally put Madho Das besides himself with anger as he returned to his hermitage and found the trespass and he sacrillege, and he at once involed his occult powers to bring the trespasser to his knees, but finding them ineffective, he himself took little time to realise and acknowledge the spiritual superiority of the Guru, at whose feet he at once surrendered himself.
४) संगत साहिब
Gurdwara Sangat Sahib is inside the old Nanded town. Its name suggests that a Sikh Sangat existed in Nanded since the time of Guru Nanak Dev's visit, or at least before the time of Guru Gobind Singh's stay here. There is a strong tradition that the treasure found at Mal Tekari was brought here for distribution among the three hundred odd warriors accompanying the Guru. It must have been a big heap of valuables because the disbursement was not in counted coins but a shieldful to each warrior, and still a part of it remained which the Guru got buried again near where it had been found. The shield with which it was dished out is still kept in this Grudwara as a sacred relic. There are three more Gurdwaras - Langar Sahib, Nanak Sar and Ratangarh Sahib - established during the twentieth century by Sant Nidhan Singh and his successors, but they cannot be said to be historical although efforts have been made to popularize legends connecting the latter two to the first and the tenth Guru respectively.
५) हिरा घाट साहिब
About nine kilometres downstream from Nanded is where Guru Gobind Singh first pitched his tents right on the Godavari bank. A legend similar to the one associated with Gurdwara Nagina Gaht Sahib is also related to this shrine. Here it was the emperor, Bahadur Shah, who presented to the Guru a hira (diamond) which the Guru flung into the river, and asked the offended emperor to look into the river, where the latter saw heaps of diamonds. The emperor was deeply impressed and he bowed to the Guru with humility.
६) माता साहिब
This Gurudwara is marks the site of Guru ka Langar supervised by Mata Sahib Devan while the Guru stayed at Gurdwara Hira Ghat. The tradition is kept alive still by serving mid-day meal to pilgrims going the round of various shrines together or in batches traveling by bus, arranged by the Management Board of Takht Sahib. About 250 acres of land, partly arable, are attached to this Gurdwara. The Gurdwara and the land are managed under the auspices of the Management Board. Here Mata Sahib Kaur Ji, the wife of Sri Guru Gobind Singh Ji had meditated for long time in previous birth and when Guru Gobind Singh Ji came to Nanded, she used to meditate again at the holy site. Guru Ji after daylong travels and hunting would come to this place and take lunch. From that time the Langer or free kitchen is served at this Gurdwara Mata Sahib Kaur Ji, afterwards left for Delhi and took away some weapons of Guru Sahib for daily worship and departed for her heavenly abode there.
७) मालटेकडी साहिब
Gurudwara Mal Tekdi Sahib, dedicated to Guru Nanak Dev ji is about five kilometer from Sachkhand Sri Hazur Sahib and is linked to the Nanded-Akola road.
Sri Guru Nanak Dev Ji had visited this place during his journey to Sangla-Deep (known as Sri Lanka or Ceylon now-a-days) Guru Nanak Dev ji is said to have held religious courses with a Muslim reclause Lakkad Shah at this spot called ‘Maal Tilla’ or ‘Chakri Maal’. Lakkad Shah's grave is about 100 mtrs., away from the present Gurudwara. The money, which the Tenth Guru distributed at Gurudwara Sangat Sahib, was dug out from this place.
८) श्री शिकार घाट साहिब
Gurudwara Shikar Ghat Sahib is a beautiful piece of architecture perched on a low hill near the bank of Godavari river, with high wooded hills in the background. Its distance from Sachkand Sri Hazur Sahib is about six kilometers. A bridge was constructed by kar-seva and built over the river Godavari.
A legend is associated with this shrine, too. It is said that Guru Gobind Singh ji came here following the chase (shikar) and killed a rabbit which in a former birth had been Bhai Mula, who belonged to Sialkot (now in Pakistan). He had once accompanied Guru Nanak Dev ji during his travels. Once when Guru Nanak Dev ji went to visit him, Mula avoided the Guru and hid himself for fear that the Guru might take him away on another long journey. Sensing this Guru Nanak Dev ji went away, but such is the travesty of fate that Mula died soon after of snakebite. His repentant soul had since been wandering in different sub-human bodies until, Guru Gobind Singh ji emancipated it by the touch of his arrow.
The present building complex of Shikar Ghat Sahib was re-laid by Baba Jiwan Singh and Baba Dalip Singh Kar sewawale during the 1960’s and early 1970’s. The square sanctum, where Guru Granth Sahib is seated on a canopied throne of white marble, is in the middle of a square hall with walls covered with white marble slabs and ceiling with white glazed tiles. Above the hall, there is a dome over the sanctum, domed kiosks at the corners, and decorative domelets along the length of the walls. The entire exterior from the base upto the top of the dome is covered with white marble slabs. The pinnacle is also of white marble.
आता तरी या गुरूद्वारयांचे पत्ते आणि नावं लक्षात असू द्या मित्रांनो, जेनेकरुन एखाद्या बाहेर गावाहून आलेल्या शिख भाविक/पर्यटकाने तुम्हाला माहिती विचारली तर तुम्हाला त्यांना मदत करता यायला हवी.
Labels:
निसर्ग/पर्यटन/प्रवासवर्णन
Friday, September 19, 2008
Saturday, September 13, 2008
महाप्रलयाचा डेमो ?
दिनांक --> १२ सप्टेंबर २००८
वेळ --> सकाळचे २.००
स्थळ --> नांदेड
दि. १२ सप्टेंबर २००८ रोजी अगदी पहाटे २.०० वाजता गगनभेदी कडकडाटामुळे नांदेडीअन्सची झोपच उडून गेली.
असा एकही नांदेडीअन मिळणार नाही की जो या आवाजाने जागा झाला नसेल.
त्या दिवशी सकाळी २.०० वाजता निसर्गाने रौद्ररुप धारण केले आणि सर्व नांदेडीअन्सची पाचावर धारण बसली.
होय, अगदी एखाद्या भयपटाला शोभावे असेच वातावरण तयार झाले होते त्यावेळी.
विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट हा तर प्रत्येक नांदेडीअनने कित्येकदा अनुभवला होता, पण या वेळेस मात्र हे आवाज अगदी गगणभेदी असेच होते.
पाऊसही अगदी आभाळ फाटल्यागत कोसळत होता.
भरीत भर म्हणून याच वेळामध्ये वीज पुरवठा अचानक खंडीत झाला आणि परिस्थिती अधिकच भयावह झाली.
जवळपास दिड/दोन तासाने म्हणजेच ३.३०/४.०० वाजता निसर्गाचे रौद्ररूप शांत झाले.
जसा जसा दिवस वर येत होता तसा तसा हाच विषय प्रत्येक नांदेडीअनच्या जिभेवर रेंगाळत होता.
शेवटी प्रत्येक नांदेडीअनच्या तोंडी एकच शब्द होते की :-
" निसर्गाचे असे रौद्ररूप आम्ही यापूर्वी कधिही अनुभवले नाही. "
१३ तारखेच्या वृत्तपत्रांमध्ये याबद्दल आलेल्या काही बातम्या
प्रजावाणी
शनिवार, दि. १३ सप्टेंबर २००८
गगनभेदी कडकडाटामुळे नागरिक भयभीत
उत्तर रात्रीच्या गाढझोपेत असलेल्या नांदेडकरांना आकाश हलवून सोडणार्या गगनभेदी विजांच्या कडकडाटाने हादरवून सोडले.
१० सप्टेंबर रोजी झालेल्या महाप्रयोगाच्या चर्चेतून नागरिक सावरत नाहीत तोच मध्यरात्री २ च्या सुमारास झालेल्या मोठमोठ्या आवाजाने सर्वांची झोप उडाली.
दीर्घ प्रतिक्षेनंतर जिल्हाभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून काल मध्यरात्री २ च्या सुमारास आकाशात विजेचा कडकडात होताना मोठा आवाज झाला. हा आवाज इतका मोठा होता की जमीनीसह घरातील काही वस्तू हलल्याचा भास होत होता.
काही जणांनी डोंगरावरील मोठ्या दगडांची टक्कर झाल्यासारखा आवाज ऐकू आल्याचे सांगितले.
या महाकाय आवाजामुळे अनेकांची झोप उडाली. अर्धा तास आवाजांचा प्रलय सुरू होता. त्यानंतर वीज पुरवठा खंडीत झाल्याने भितीत भर पडत होती.
आयुष्यात प्रथमच वीजांच्या अशा कडकडाचा विचित्र असा आवाज ऐकल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले.
वृत्त वाहिन्यांनी दोन दिवसांपूर्वीच महाप्रयोगामुळे जगबुडी होणार असल्याची भिती पसरवून कल्पोकल्पीत कथा तयार केल्या होत्या त्यामुळे नागरिकांमध्ये तर्क-वितर्क होत होते.
गेल्या वर्षभरापासून जमिनीतून येणार्या आवाजामुळे नांदेडकरांना भुकंपसदृष्य आवाज नवे नाहीत, परंतू महाप्रयोगातून होणारया प्रलयाच्या अफवेमुळे नांदेडकरांच्या शंकेतही भर पडली होती.
सकाळ
शनिवार, दि. १३ सप्टेंबर २००८
गुरुवारी मध्यरात्रीनंतर नांदेडमध्ये मुसळधार पावसाला सुरवात झाली. या कालावधीत रात्री पावणेतीनच्या सुमारास आभाळात जोरदार गडगडाट सुरू झाला.
या भयंकर आणि भेसूर आवाजाने नांदेडकरांमध्ये घबराट पसरली होती. विविध रुग्णालयांत रुग्णांबरोबर असलेले नातेवाइक घाबरून बाहेर आले. लहान मुले झोपेतून खडबडून उठून बसली. शुक्रवारी सकाळी शहरात सर्वत्र वेगवेगळी चर्चा होती. जिनिव्हा येथे सुरू असलेल्या महाप्रयोगाचाच हा परिणाम असावा, अशीही अफवा पसरली होती.
महात्मा गांधी मिशन संचलित अंतराळ व तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, की हा घडलेला प्रकार "स्ट्रीक लाइटनिंग' व "फोर्क लाइटनिंग'चा होता.
बंगालच्या उपसागरात पावसासाठी आवश्यक असलेली स्थिती होती. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. याचवेळी अरबी समुद्राकडे "द्रोणीय' स्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणीही पावसासाठी आवश्यक असलेले घटक निर्माण होत आहेत. त्यामुळे येथेही पावसाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. या दोन वेगवेगळ्या परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्याने रात्री पावणेतीन ते साडेतीन या कालावधीत मोठे आवाज सुरू झाले.
निसर्गाच्या ताकदीचा एक वेगळा चमत्कार या "लाइटनिंग " मुळे अनुभवता आला.

महाप्रयोगाबाबत अफवा अन् घबराट

संमिश्र/विविधा
Wednesday, September 3, 2008
(*) नांदेड KMZ मध्ये (*)
खाली दिलेल्या .KMZ फाईलमध्ये मी नांदेड शहरातील आणि शहराच्या आसपासची काही महत्त्वाची ठिकाणे सेव्ह केली आहेत.
तुम्हाला तुमच्या संगणकामध्ये फक्त गुगल अर्थ इंस्टॉल करावे लागेल जेणेकरून तुम्ही ही ठिकाणं पाहू शकाल.
गुगल अर्थ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
नांदेडची ठिकाणं सेव्ह असलेली KMZ फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
गुगल अर्थ इंस्टॉल केल्यानंतर ह्या फाईलवर माऊसने डबल क्लिक करा किंवा ही फाईल गुगल अर्थमधून उघडा.
इतर काही अडचण आल्यास जरूर विचारा
माझा ई-मेल ऍड्रेस तर तुम्हाला माहितच असेल.

power_8383@yahoo.com
Labels:
इंटरनेट
Monday, September 1, 2008
!~! बाप्पा आले !~!
हो मित्रांनो, बाप्पांचे आगमन व्हायला आता फक्त काही तासच शिल्लक राहीले आहेत त्यामुळेच
नांदेडच्या मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्त्या हातोहात विकल्या जात आहेत.
अश्याच काही मूर्तीकारांच्या ठिकाणांना जेव्हा आम्ही भेट दिली आणि त्यांच्याकडून माहिती मिळविली.
त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या वर्षी गणेश मंडळांना बाप्पाची मूर्ती विकत घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील कारण मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
एका मूर्तीकाराने सांगितले की ह्या वर्षी मोठ्या मूर्त्यांना जास्त मागणी नसून लहान मूर्त्याच जास्त विकल्या गेल्या आहेत.
कदाचित कमी पाऊस हे सुद्धा त्यामागचे एक कारण असू शकते. (नदीला पाणीच नसेल तर मोठी मूर्ती कुठे विसर्जित करणार ?)
असो, खाली मी काही छायाचित्रे अपलोड करीत आहे, छायाचित्रे कशी वाटली ते जरूर कळवा.
गणपती बाप्पा .............. मोरया ।

Subscribe to:
Posts (Atom)