Monday, September 1, 2008

!~! बाप्पा आले !~!

हो मित्रांनो, बाप्पांचे आगमन व्हायला आता फक्त काही तासच शिल्लक राहीले आहेत त्यामुळेच
नांदेडच्या मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्त्या हातोहात विकल्या जात आहेत.

अश्याच काही मूर्तीकारांच्या ठिकाणांना जेव्हा आम्ही भेट दिली आणि त्यांच्याकडून माहिती मिळविली.
त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या वर्षी गणेश मंडळांना बाप्पाची मूर्ती विकत घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील कारण मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

एका मूर्तीकाराने सांगितले की ह्या वर्षी मोठ्या मूर्त्यांना जास्त मागणी नसून लहान मूर्त्याच जास्त विकल्या गेल्या आहेत.
कदाचित कमी पाऊस हे सुद्धा त्यामागचे एक कारण असू शकते. (नदीला पाणीच नसेल तर मोठी मूर्ती कुठे विसर्जित करणार ?)

असो, खाली मी काही छायाचित्रे अपलोड करीत आहे, छायाचित्रे कशी वाटली ते जरूर कळवा.


गणपती बाप्पा .............. मोरया


0 comments:

Post a Comment

Post a Comment