कविता नसते करायची
ती असते मनात कुठेतरी सुप्त,
वारंवार तिला शोधण्याचा प्रयत्न करूनही
कवीचे मन मात्र नेहमीच अतृप्त.
जिभेवर रेंगाळायला लागतात शब्द मग
कधीतरी, कुठेतरी अचानक,
पेन आणि कागद जवळ नसल्याने
कवीच्या मनाची सुरू होते तगमग.
त्याच तगमगीमुळे मग
तो आतल्या आत अस्वस्थ होत राहतो,
कुठूनतरी मग पेन आणि कागद पुढ्यात येते
आणि तो त्याच्या भावना कागदावर उतरवतो.
भावना कागदावर उतरविणे
हे सुद्धा काही सोपे नाही,
असंख्य चुका होतात लिहिताना
मग खाडाखोडीतच वाया जातात कागद आणि शाई.
अशा या प्रचंड संकटातून
काही वेळाने कवीची होते मुक्तता,
तो पकडतो कोण्यातरी जवळच्याला
आणि मग त्या बिच्याऱ्याची पुरी वाट लागून जाते
ती कविता ऐकता ऐकता.
कविता फारच पकाऊ किंवा वाईट झाली असेल तर एक बालीश प्रयत्न म्हणून माफ करावे.
- सौरभ सुरेश सावंत
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment