नाही नाही, मी आजही कोणत्या नाटकाची किंवा सिरीअलची जाहिरात करत नाहिये.
अहो आपला अजून एक नांदेडीअन सध्या टी.व्ही. वर झळकतो आहे.
आपण रामेश्वर महाजनबद्दल तर वाचलच असेल आपल्या ब्लॉगवर.
होय, तेच ते जे स्टार वनच्या 'हॅलो कौन.... ? पैचान कौन !' या मालिकेमध्ये सहभागी झाले होते.
त्यांच्या मागोमाग आता युवराज शिंदे हा नांदेडीअन सोनी टी.व्ही.च्या सुप्रसिद्ध बुगी वूगी या सिरिअलमध्ये आपली नृत्यकला सादर करत आहे.
विशेष बाब म्हणजे तो याआधी स्टार वनच्या 'हॅलो कौन.... ? पैचान कौन !' ह्या कार्यक्रमातसुद्धा सहभागी झाला होता.
तो ३ वर्षांचा असताना त्याचे वडील वारले.
पण त्याच्या आईने अपार मेहनत घेऊन त्याला लहानाचे मोठे केले.
पण तो जाणता झाला तेव्हाही त्याच्या घरची परिस्थीती अत्यंत हलाखीचीच होती.
त्याने अगदी दीड रुपये रोजासाठी भेळच्या गाड्यावर प्लेट धुण्याचे कामसुद्धा केलेले आहे.
काही वर्षांनंतर त्याची आईसुद्धा त्याला सोडून देवाघरी गेली.
पण तो अजून पुर्णपणे पोरका झाला नव्हता कारण त्याच्यासोबत अजूनही त्याची नृत्याची कला होती.
पुढे 'रॉकस्टार अकादमी' च्या माध्यमातून तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि आज तो विविध टि.व्ही. चॅनेल्सच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेऊन स्वतःची कला संपूर्ण जगासमोर मांडत आहे आणि पर्यायाने नांदेडचे नाव उंचावत आहे.
प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते युवराजकडे पाहून खरे आहे असे वाटते.
त्याच्या अथक परिश्रमांना, त्याच्या जिद्दीला आणि त्याला नांदेडीअन्सचा सलाम.
0 comments:
Post a Comment