Tuesday, October 6, 2009
गोष्ट छोटी डोंगराएवढी
नमस्कार मित्रांनो,
आज जरा नांदेडशी संबंधीत नसलेला टॉपिक पोस्ट करतोय, माफ करा.
कालच 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' हा चित्रपट पाहिला.
अतिशय छान झाला आहे.
मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले इत्यादी सर्वांचीच ऍक्टींग चांगली झाली आहे.
निळू फुलेंनी आपल्या थोड्याच का होईना पण त्या त्या Scene मध्ये बाकी सर्वांना खाऊन टाकले आहे.
चित्रपटाचे Background Music तर नीव्वळ अप्रतिम.
नंद्याला एप्रील फूल बनवण्याचा प्रसंग डोळ्यात पाणी आणतो.
उदास झालेल्या नंद्याने क्रीकेट कॉमेंट्री ऎकणार्या त्याच्या मित्राला "धोनी आणून देतो का रे ज्वारी ?" असा प्रश्न विचारल्यावर चित्रपटगृहात एकच हशा पिकतो पण लगेच "तेंडूलकर आऊट झाल्यावर बाप मेल्यावानी तोंड करता आणि तीकडे बाप शेतात राबराब राबतो त्याचे काय रे ?" असे प्रश्न जेव्हा नंद्या विचारतो तेव्हा चित्रपटगृहात स्मशानशांतता पसरते.
नंद्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरी येणारे न्युज चॅनेलचे पत्रकार, राजारामला दवाखाण्यात, पोलीसांवर राग येण्याचे प्रसंगही फार चांगले जमले आहेत.
कृषीमंत्र्याची ए.श्टी. तून प्रवास करतांना कशी दमछाक होते हा प्रसंग तीतकाच हलकाफूलका दाखवला आहे.
लोडशेडींगचा प्रश्नही वेळोवेळी चांगल्या प्रकारे मांडण्यात आला आहे.
फक्त एकाच जागी डायरेक्टरकडून थोडी चूक(?) झाल्यासारखी वाटते कारण त्यांनी कृषीमंत्र्यांच्या अपहरणाचा प्रसंग फारच अतिशयोक्तीपूर्ण दाखवला आहे.
एवढे सोडले तर बाकी चित्रपटात सगळीकडे ग्रामिण जीवनाचे वास्तवदर्शनच झाले आहे.
मी तर बुवा पाहिला चित्रपट.
तुम्ही पाहिला नसेल तर लवकर जाऊन पाहा.
Labels:
राजनिती/चित्रपट
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
good review
Post a Comment