तसे तर आपण सर्व सुज्ञ आहातच.
एकच विनंती आहे की उद्या मतदानाला जायचे टाळू नका.
मतदानाचा हक्क बजावा.
परवा एका राजकारण्याच्या गाडीतून २१ लाख रूपयांची रोकड पोलीसांनी जप्त केली.
ती रक्कम म्हणे गैरमार्गासाठी वापरण्यात येणार होती.
आज शहरातल्या दुसर्या उमेदवाराच्या ३ कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडले म्हणे पोलीसांनी.
तीकडे ग्रामिण भागात आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमधे जोरदार राडा झाला.
अशा बातम्या ऎकल्यावर खरंच कशाला मतदान करायचं असंही वाटून जातं.
पण दुःखाच्या प्रत्येक रात्रीनंतर एक सोनेरी पहाट असतेच असा विचार करून आपण मतदान करायलाच हवे.
तेव्हा उद्याच्या दिवसाकडे अजून एक हॉलीडे म्हणून न पाहता तुमचा मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि योग्य उमेदवाराला निवडून आणा. :-)
0 comments:
Post a Comment