Thursday, October 22, 2009

लोहा आणि नायगावमधील अटीतटीचे सामने

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नायगाव आणि लोहा मतदारसंघाचे चित्र आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्र्यांचे कट्टर शत्रू प्रतापराव पाटील चिखलीकर (अपक्ष) आणि राष्ट्रवादीचे शंकरअण्णा धोंडगे यांच्यात अतिशय चुरशीचा सामना रंगला होता.
प्रत्येक फेरीला फक्त ५०-१०० मतांच्या फरकाने दोघेही पुढे-मागे होत होते, पण शेवटच्या ७-८ फेर्‍यांमध्ये अण्णांनी आघाडी घेतली आणि शेवटी ते ९७०० मतांनी विजयी झाले.
जर चिखलीकर निवडून आले असते तर त्यांना एखादं मोठ्ठं मंत्रीपद देण्याशिवाय पर्यायच नसला असता.
शिर्डी येथे त्यांनी अपक्षांची मिटींग ठेवली होती आणि त्यात त्यांना एकमताने अपक्षांचे प्रमुख बनविण्यात आले होते.


तर दुसरीकडे नायगाव विधानसभा मतदारसंघात वेगळेच चित्र होते.
इथे राष्ट्रवादीचे बापुसाहेब गोरठेकर आणि राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यातच सरळसरळ लढत होती.
सकाळपासूनच गोरठेकर प्रत्येक फेरीगणिक आपली आघाडी एक एक हजाराने वाढवीत होते.
१७ व्या फेरीपर्यंत ही आघाडी ८००० वर आली होती पण यानंतर मात्र वसंतरावांनी मुसंडी मारत जवळपास ४ हजारांची आघाडी घेतली आहे.
शेवटच्या १-२ फेर्‍या राहिल्यात आणि आता गोरठेकरांना लीड भेटण्याची शक्यता फार कमी आहे.

थोड्या वेळानंतर जेव्हा चित्र पुर्ण स्पष्ट होईल तेव्हा नवीन पोस्टमध्ये मी तुम्हाला अपडेट देईन.

0 comments:

Post a Comment

Post a Comment