माफ करा मित्रांनो, हा ब्लॉगपोस्ट लिहीण्यास खूप उशीर झाला माझ्याकडून.
असो, कुणीतरी म्हटलेलंच आहे 'Better late than never'.
हा ब्लॉगपोस्ट मी नांदेड शहर मनपा आणि वाहतूक शाखेला मनापासून अर्पण करतो.
मनापासून हा शब्द मुद्दामहून वापरलाय, कारण काय आहे आजकाल प्रत्येक जण माझ्या प्रत्येक वाक्यात टोमणाच शोधू लागला आहे.
अरे चांगल्या कामासाठी चांगलेच लिहीतो आम्ही.
मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की वाहतूक सुरक्षा सप्ताह ७ जानेवारी २०१० ला संपला. (अधिक माहिती.)
८ जानेवारी २०१० रोजी वाहतूक शाखा आणि मनपाने जो धुमधडाका सुरू केला, तो आजही सुरूच आहे.
तुम्ही विचार करत असाल की मी काय हे सारखं सारखं धुमधडाका, धुमधडाका लावलंय.
अहो तुम्हाला जेव्हा पूर्ण बातमी कळेल तेव्हा तुम्हीही या सगळ्या प्रकरणाला वाहतूक शाखा आणि मनपाचा धुमधडाकाच म्हणाल. (चांगल्या अर्थाने.)
त्याचे काय आहे, ८ जानेवारी २०१० रोजी फूटपाथ मोकळे करणे, अतिक्रमण हटविणे, वाहनांच्या नंबरप्लेट नियमानुसार करून घेणे आणि नागरिकांना शिस्त लावणे इत्यादी कामांसाठी पोलीस आणि मनपा यांच्यातर्फे एक मोहिम हाती घेण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत भरपूर वाहनांची चेकींग करण्यात आली, हातगाडेवाल्यांना रस्त्यावरून हटवण्यात आले, जागोजागी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.
यात पोलिस प्रशासनाचे २०५, मनपाचे १०० व आर.टी.ओ.चे काही अधिकारी असे जवळपास ३२५ जण होते.
सगळ्यांना वाटलं की चहूबाजूंनी होणार्या टिकेमुळे वाहतूक शाखेने एक दिवसाचा पब्लिसिटी स्टंट आखला असेल.
पण दिवसेंदिवस हा वाहतूक सुधार कृती कार्यक्रम अधिकाधिक कडक होत गेला तेव्हा लोकांना याची गंभिरता आणि महत्त्व पटले.
९ तारखेला तर कलामंदीर परीसरातील हातगाडेवाल्यांनी पोलिसांवरच दगडफेक केली.
पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर उपलब्ध होता म्हणून बरे झाले, नाहीतर परिस्थीती अजून बिघडली असती.
१४ तारखेला अण्णा भाऊ साठे चौकातसुद्धा पोलिसांत आणि हातगाडेवाल्यांमधे बाचाबाची झाली होती.
पोलिंसाचा अतिक्रमण दूर करण्याचा ठाम निश्चय पाहून नंतर काही व्यापार्यांनी नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण केलेल्या जागेवरून स्वतःहून आपले सामान दूर केले.
पोलिसांनी केवळ हातगाडेवाल्यांनाच टार्गेट केले नाही तर दुचाकीधारकांकडूनही जबर दंड वसूल केला.
दुचाकीच्या फॅन्सी नंबरप्लेट्स बदलण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासोबत एक पेंटरच ठेवला होता, नंबरप्लेट नियमानूसार करायला.
फॅन्सी नंबरप्लेट्स व नंबरप्लेट्स नसलेल्या वाहनांवर कार्रवाई करून ’दादा, बाबा, मामा, राज, काका’ असे लिहीलेले नंबरप्लेट्स काढून जागेवरच नवीन नंबरप्लेट बसवण्याच्या अभिनव उपक्रमामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
या एकाच दिवशी तब्बल ५०० नंबरप्लेट्सच्या केसेस सॉल्व्ह झाल्या म्हणे.
हळूहळू पोलिसांनी शहरातील अनेक भागांमधे हीच कार्रवाही सुरू ठेवली आणि त्याचे यथोचीत परीणामसुद्धा दिसायला लागले.
पुर्वी अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम लागायचे, पण या मोहिमेमूळे ट्रॅफिक जॅमच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.
:: दादरा ओव्हरब्रीज ::
दादरा ओव्हरब्रीजच्या कलामंदीरकडच्या टेकऑफ पॉईंटवर जे ऑटोवाले थांबतात त्यांच्यावर वाहतूक शाखेने, पोलिसांनी अजून काहीच कार्रवाई केलेली नाही.

:: फुटपाथ स्वतंत्र झाले ::
शहरात जागोजागी पाश्चात्य पद्धतीचे फुटपाथ बसवण्यात आले होते, पण या फुटपाथवर एकतर दुकानदारांनी किंवा हातगाडेवाल्यांनी अतिक्रमण केले होते त्यामुळे नाईलाजास्तव पादचार्यांना रस्त्यावरून चालावे लागायचे.
पण आता फुटपाथांवरचे अतिक्रमण काढल्यामुळे पादचारी आणि वाहनधारक दोघांनाही मदत झाली आहे.
एकूणच या धडक मोहिमुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पण नांदेडच्या वाहतूकीला शिस्त मात्र लागली आहे हे नक्की.
पोलिसांनी ही मोहिम अजून काही दिवस अशीच सुरू ठेवली तर नांदेडीअन्सनाही वाहतूकीचे नियम पाळायची सवय लागेल आणि मग आपोआपच वाहतूकीला शिस्त लागेल.
पण पोलिसांनी ह्या मोहिमेत थोडी जरी ढिलाई दिली तर पहिले पाढे पंचावण्ण होणार यात काहीही शंका नाही.
:: श्रेय कुणाला ? ::
प्रत्येक वृत्तपत्र आता आपापल्या परीने ही मोहिम सुरू करण्याच्या प्रक्रीयेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्याला हे श्रेय लाटण्याचा भानगडीत पडायचे नाही पण तुम्हाला माहिती असावे म्हणून सांगतो :-
ऑर्कूटवर एक कम्युनिटी आहे, "Ashokrao Chavan" नावाची, ज्यात विपूल मोळके हेसुद्धा एक सभासद आहेत.
विपूल मोळके हे वार्ड क्रमांक २२ (गोकूळनगर) इथले नगरसेवक आहेत.
याच नांदेडमधल्या वाहतूकीच्या समस्येवर आम्ही त्या कम्युनिटीत चर्चा करत होतोत आणि त्यावर विपूल मोळके यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली.
ते काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे इथे पेस्ट करतो.
२५ डिसेंबर ०९ रोजी त्यांनी हे आश्वासन दिलं आणि ८ जानेवारी २०१० पासून हा धडक कृती कार्यक्रम सुरू झाला.
आता याचे श्रेय कुणाला द्यायचे हे तुम्ही ठरवा.
वाहतूक शाखा आणि मनपाला, की नांदेडच्या वृत्तपत्रांना, की विपूल मोळके यांना, की जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांना, की अमिता भाभींना बेशीस्त वाहतूकीचा अनुभव देणार्या त्या ऑटॊचालकाला हे तुम्हीच ठरवा.
एक गोष्ट नक्की की या सर्व 'की' पैकी कोणतेही KEY लागलेली असली तरी फायदा मात्र नांदेडीअन्सचाच झाला आहे.

"Dear saurabh i know that there is problem in the trafic signals thats not only in signal but also int the traffic of our city nanded
we means every one of nanded city shold have to follow the rules of traffic and after that only we can change the condition of traffic in nanded.
ok i will put this matter towards commissioner of nwcmc and sp of nanded as to attend u r matter and try to arrange the special meeting with both mla s of nanded ,commissioner , sp of nanded ,traffic pi of city myself , hon mayor of the city and all concern officers and hon cm also and if nessasery
thanks for complain "
we means every one of nanded city shold have to follow the rules of traffic and after that only we can change the condition of traffic in nanded.
ok i will put this matter towards commissioner of nwcmc and sp of nanded as to attend u r matter and try to arrange the special meeting with both mla s of nanded ,commissioner , sp of nanded ,traffic pi of city myself , hon mayor of the city and all concern officers and hon cm also and if nessasery
thanks for complain "
२५ डिसेंबर ०९ रोजी त्यांनी हे आश्वासन दिलं आणि ८ जानेवारी २०१० पासून हा धडक कृती कार्यक्रम सुरू झाला.
आता याचे श्रेय कुणाला द्यायचे हे तुम्ही ठरवा.
वाहतूक शाखा आणि मनपाला, की नांदेडच्या वृत्तपत्रांना, की विपूल मोळके यांना, की जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांना, की अमिता भाभींना बेशीस्त वाहतूकीचा अनुभव देणार्या त्या ऑटॊचालकाला हे तुम्हीच ठरवा.
एक गोष्ट नक्की की या सर्व 'की' पैकी कोणतेही KEY लागलेली असली तरी फायदा मात्र नांदेडीअन्सचाच झाला आहे.
0 comments:
Post a Comment