Saturday, March 27, 2010

ऑर्कूट आणि नांदेडचा विकास

नमस्कार मित्रांनो,
आपण नेहमी नांदेडच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत आलोत.
आजवर ती चर्चा फक्त ऑर्कूटपुरतीच किंवा आपल्या ह्या ब्लॉगपुरतीच मर्यादीत होती कारण त्या चर्चेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणारा नांदेडचा एकही राजकीय नेता किंवा सामाजिक कार्यकर्ता ऑर्कूटवर नव्हता.

पण आता तसे होणार नाही, कारण आता ऑर्कूटवर श्री. निलेश पावडे आणि श्री. विपूल मोळके या दोन व्यक्तींनी मोर्चा (अकांऊट) उघडला आहे. :p

श्री. निलेश पावडे हे युवक कॉंग्रेसचे नांदेड जिल्ह्याचे Legal Advisor आहेत.
त्यांच्या पत्नी सौ. जयश्री निलेश पावडे ह्या कॉंग्रेसच्या असून त्या वार्ड क्रमांक १३ च्या नगरसेविका आहेत.

श्री. विपूल मोळके हे कॉंग्रसचेच वार्ड क्रमांक २२ मधले नगरसेवक आहेत.
ते स्थायी समितीचे माजी सदस्य आहेत.

तेव्हा तुम्ही आता तुमच्या काही शंका किंवा सुचना असतील तर सरळ त्यांच्यापर्यंत पाठवू शकता.

ते या सगळ्या चर्चांकडे सकारात्मकरीत्या पाहत असल्याची माझीसुद्धा खात्री पटली आहे कारण कालच त्यांनी शहरातील दिशादर्शकांवरील अशुद्धलेखनाची तक्रार मनपा आयुक्त डॉ. श्री. दिपक म्हैसेकर यांच्याकडे केली आहे. (आठवताहेत का मी काढलेल्या ह्या फोटो ? (1) (2) (3) )
त्यावर डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आम्ही योग्य ती कार्रवाई करू असे आश्वासन दिले आहे.


कचर्‍याचा प्रश्न, मनपाच्या वेबसाईटमधील काही त्रुटी, फुटलेल्या पाईप्समधून होणारा पाण्याचा अपव्यय या आणि अशा अनेक समस्यांकडे लक्ष देण्यात येईल असे श्री. विपूल मोळके यांनी कबूल केले आहे.


विपूल मोळके आणि निलेश पावडे यांच्या अशा सकारात्मक प्रतिसादामुळे अनेक सभासद त्यांच्या ऑर्कूटवरील कम्युनिटीकडे आकर्षीत होत आहेत आणि आपापल्या शंका, तक्रारी किंवा सल्ले तीथे मांडत आहेत.


ऑर्कूटसारख्या सोशल नेटवर्किंग साईटच्या नावाने नेहमी खडे फोडणार्यांनी हे पाहावे की ऑर्कूटवरून अशी विधायक कामंसुद्धा होऊ शकतात.

2 comments:

SATYAM said...

Good WORK BUDDY KEEP IT UP

सौरभ said...

Thanks bro. :)

Post a Comment

Post a Comment