Sunday, March 21, 2010

नांदेड भारनियमनमुक्त होणार.

वीज वितरण कंपनीच्या निर्णयानुसार दि. एप्रिल २०१० पासून नांदेड भारनियमनमुक्त होणार असून प्रति युनिटमागे ४७ पैशांची वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते.
वीज वितरण कंपनीने राज्यातील काही जिल्ह्यांसह नांदेड जिल्हाही भारनियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या जिल्ह्यात विजेची ४२ टक्के पेक्षा कमी तुट आहे अशा जिल्ह्यांची निवड वीज वितरण कंपनीने केली आहे.

याबाबतचा अंतीम निर्णय २५ मार्च रोजी वीज नियामक आयोगासमोर होणार आहे.
त्यानंतर नांदेड एप्रिलपासून भारनियमनमुक्त होणार असल्याचे वृत्त आहे.

-- दैनिक समिक्षा (२० मार्च २०१०)


विश्वास बसत नाहीये ना ?
अहो तुमची काय चूक त्यात, 'नांदेड भारनियमनमुक्त होईल' या वाक्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
पण काही दिवसांपासून सगळ्या वृत्तपत्रांत यांसंबंधीच्या बातम्या येत आहेत, तेव्हा विश्वास ठेवायला काय हरकत आहे.



या बातमीमुळे माझे आई-वडील फार नाराज झाले आहेत.
भारनियमनाचा सध्या जो कार्यक्रम सुरू आहे, त्यानुसार किमान लाईट गेल्यावर तरी साहजिकच मला नाईलाजास्तव लॅपटॉप/इंटरनेट बंद करावेच लागते आणि अभ्यास नावाच्या शत्रूला लाईट येईपर्यंत मित्र बनवावे लागते.
आता माझ्या आई-वडीलांना भीती वाटत आहे की मी दिवसभर लॅपटॉपपुढून हलणारच नाही. (त्यांना अशी भीती वाटणे साहजिकच आहे, कारण आपल्याला भीती त्याच गोष्टीची वाटते जी गोष्ट घडू शकते.)

काही दिवसांतच 'ईन्व्हर्टर :- माणसाचा खरा मित्र' हा निबंध परीक्षेत विचारल्या जाऊ शकला असता, पण आता त्या ईन्व्हर्टरचे भवीतव्य काय असेल माहित नाही.


आता फक्त वीज वितरण कंपनीने आपल्याला १ एप्रीलला "एप्रिल फूल" बनवू नये म्हणजे झालं.
>

4 comments:

आनंद पत्रे said...

असे असेल तर स्वागतच आहे...

सौरभ said...

वाट पाहणेच हाती आहे सध्यातरी आपल्या.
बघुयात.

सौरभ said...

अपनेको तो एप्रील फूल बनाया गया है बॉस ऍज एक्स्पेक्टेड. :P

Unknown said...

अपेक्षे प्रमाणेच पुन्हा एकदा नांदेडकरांच्या हाती निराशाच आली , नांदेडकरांच्या म्हणया पेक्षा बाकी सर्व जिल्हे जे लोडशेडिंग मुक्त होणार होते त्यांच्या पण हाती निराशाच लागली आहे, MSEB walayni April Fool banval sarvana,

MARASHTRA SARAKAR NI NIRNAY GHETLAY KI PUDCHYA MHANJECH 2014 CHYA ELECTION NANTAR MH HA LOAD SHADING FREE HONAR AHE:(, SO SAD NA ,,
MH GOV SUCKS...

Post a Comment

Post a Comment