Monday, April 27, 2009

ब्लॉग अपडेट :(

माफ करा मित्रांनो, माझ्या बी.सी.ए. तृतीय वर्षाच्या परिक्षा असल्यामुळे मी काही दिवसांपासून ब्लॉग अपडेट करू शकलो नाही.
माझ्या परिक्षा १० मे रोजी संपतील त्यामुळे आता ब्लॉग १० तारखेनंतरच अपडेट होईल.

धन्यवाद.

Monday, April 20, 2009

सूर्यनारायण कोपला

मित्रांनो सूर्यदेवताची प्रखर नजर नांदेडवर अजून काही दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे.
काल नांदेड येथे कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सीअस नोंदवील्या गेले तर आज (सोमवारी) http://www.wunderground.com/ ह्या संकेतस्थळावर नांदेडचे तापमान ४३ अंश सेल्सीअस इतके दर्शवीत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेची ही लाट अजून काही दिवस तरी कमी होण्याची शक्यता नाहीये.

तरी राज्याच्या विदर्भ आणि खानदेश या भागांच्या तुलनेत मराठवाड्याची स्थीती चांगलीच म्हणायला हवी.

राज्यातील काही शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे :-
अकोला ४४.५, औरंगाबाद ४१.६, नागपूर ४४.२, पुणे ४१.६, सोलापूर ४३.७, चंद्रपूर ४३.८, वर्धा ४३.४, परभणी ४२.७ अंश, अमरावती ४७, जळगाव ४७.

अजून मे उजाडायचा आहे मित्रांनो.
मे मधे कमाल तापमान उच्चांकाचे कोणकोणते विक्रम मोडतात कुणास ठावूक.


:: आला उन्हाळा, तब्बेत सांभाळा! ::



या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे माहिती आहे ?
आपण स्वतः.
होय आपणच, समस्त मनुष्य वर्ग.
आपल्या स्वार्थासाठी आपण निसर्गाला नुकसान पोहचवून ग्लोबल वार्मींगला कायमचा पाहुणा बनवून घेतला, त्याचेच फळ आपण आत्ता भोगतोय आणि भविष्यातही भोगावे लागतील.

अजून वेळ गेली नाही मित्रांनो.
मान्य आहे की ग्लोबल वार्मिंग आज संपुर्ण जगासाठी एक मोठी समस्या आहे पण ती अजूनही हाताबाहेर नक्कीच गेलेली नाही मित्रांनो.
तुम्ही तुमच्या घरासमोर मोकळ्या जागेत, परसबागेत किंवा शक्य असेल तिथे झाडे लावा.
ग्लोबल वार्मिंगला काबुत आणण्यासाठी तुम्ही तुमचा खारीचा वाटा उचलायलाच हवा.


Saturday, April 18, 2009

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय"

पाहीलाय का ?
नाही ? :O


मराठीत असे चित्रपट फार क्वचितच बनतात, तेव्हा लवकरात लवकर पाहून घ्या.

आता मी जास्त काही बोलत नाही, नाहीतर तुम्ही मलाच रागावाल इतक्या उशिरा का काढला टॉपिक म्हणून. :P


:: चित्रपट समिक्षा ::

Thursday, April 16, 2009

मतदार राजाचा दिवस.



होय मतदार राजा, आज तुझाच दिवस आहे.
योग्य व्यक्तीला मतदान करुन स्वतःचा आजचा दिवस आणि पुढील भविष्य चिंतामुक्त करून घे.

उठ मतदार राजा.
मतदान कर.

Tuesday, April 14, 2009

खजिना-ए-मराठी फॉन्ट्स

नमस्कार मित्रांनो,
आज मी
तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठी फॉन्ट्सचा खजीना.
आज मी अपलोड करणार आहे जवळपास २०० मराठी फॉन्ट्स आणि तेही एकत्रीत.

संपूर्ण इंटरनेटवर जरी शोधलंत तरी तुम्हाला मराठी फॉन्ट्सचा इतका मोठा संग्रह मिळनार नाही.



::
Download Link ::
http://www.mediafire.com/?ozztvyq2mhi

::
Size ::
6.77 MB

सुजाण नागरिकांशी मा.मुख्यमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांचा थेट संवाद

सुजाण नागरिकांशी मा.मुख्यमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांचा थेट संवाद
मंगळवार, दि. १४ एप्रिल २००९ रोजी सकाळी ९.३० वाजता.
स्थळ :- आय.टी.एम. कॉलेज, व्ही.आय.पी. रोड, नांदेड
येथे पार पडणार आहे.

Sunday, April 12, 2009

प्रसिद्ध सिने-अभिनेते आज नांदेडमधे

भारतीय राष्टीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाइं व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रचारासाठी आज १२ एप्रिल २००९ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता इंदिरा गांधी मैदानावर
सुप्रसिद्ध सिने-अभिनेता सुनिल शेट्टी,
कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव,
सागरिका घाटगे
(चक दे इंडीया फेम),
मिनीषा लांबा
(अभिनेत्री)
आणि
आदिती गोवित्रीकर
(अभिनेत्री, माजी मिस इंडिया) यांची जाहीर सभा होणार आहे.

Saturday, April 11, 2009

नांदेड लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची यादी. (2009)

१०० ! शंभर !

धन्यवाद.








धन्यवाद.

Sunday, April 5, 2009

प्रतिसादक नांदेडीअन्स !

नमस्कार मित्रांनो.
बरेच दिवस झाले, असा एखादा टॉपिक काढायचा विचार करत होतो.
आज योग्य वेळ आहे.

तर मित्रांनो, मी या टॉपिकमध्ये माझे स्वतःचे असे काही पोस्ट करणार नसून तुमचेच शब्द प्रकाशित करणार आहे.

होय, मी पोस्ट करणार आहे तुमची तिच मतं, सुचना, शंका, प्रश्न, स्तुतीपर शब्दसुमने जे तुम्ही या ब्लॉगच्या वेग-वेगळ्या लेखांवर मांडली आहेत किंवा मला ई-मेलद्वारे कळविली आहेत, काही जणांनी फोनवरून तर काही जणांनी प्रत्यक्षात भेटून माझी पाठ थोपटली आहे.

आज मी आपल्या ब्लॉगवर नव्व्यानवी (९९) पोस्ट लिहीत आहे.
हे सर्व तुम्हा वाचकांमुळे संभव झाले आहे मित्रांनो.
तुम्ही तुमचा अमुल्य वेळ देऊन माझा ब्लॉग वाचता, त्यावर प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचे मानावेत तितके आभार कमी आहेत.



ब्लॉगमध्ये मी लिहीलेल्या विविध लेखांवर उमटलेले प्रतिसाद वाचण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा :-




९९ पैकी फक्त १९ का होईना पण नांदेडीअन्सनी माझ्या ब्लॉगवर त्यांची मतं नोंदविली हे मी माझ्यासाठी भाग्याचे समजतो.



ऑर्कूटवर नांदेड कम्युनिटीमध्ये नांदेडीअन्सनी आपल्या ब्लॉगबाबत मांडलेले मत
Topic Link





1)
Sandeep Emekar Said :- Its a perfect blog....I really appreciate your hard work

2) SaSa said :- its realy nice yaar NANDED ka khajan hai ye to

3) Suleman said :- yea thats g88 work man also add adsense ads

4) Adesh said :- Nice work .. U r really the true Nandedian who cares so much about the city.

5) Prashant said :- Great Job... Absolutely fantastic.blog.....great job dear....keep it up.....





माझा ब्लॉग आपण नेहमी वाचता त्याबद्दल धन्यवाद.
एक विनंती अशी की शक्य होईल तेव्हा अगदी थोडासा वेळ काढून ब्लॉगवरील पोस्टला कमेंट देत चला.
(तुमच्या सुविधेसाठी नवीन कमेंट बॉक्स बनविला आहे.)

नांदेडीअन्स ब्लॉग आणि माझ्यावर असाच तुमच्या प्रेमाचा वर्षाव करत राहा.



Wednesday, April 1, 2009

गुगल सर्च आणि नांदेडीअन्स.

अभिनंदन मित्रांनो !

मी आज सहजच गुगल सर्च इंजीनवर 'नांदेड' हा की-वर्ड (शब्द) शोधून पाहिला आणि काय आश्चर्य, गुगल वेब सर्च रिजल्टच्या पहिल्या दहा संकेतस्थळांमध्ये आपला ब्लॉग दोन वेळा नमुद करण्यात आला आहे.

तुम्हाला आनंद झाला की नाही माहित नाही, पण माझा आनंद मात्र आज गगनात मावेनासा झालाय.



नांदेडीअन्स गुगल सर्चमध्ये पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.